आसाम रायफलमध्ये भरतीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक

आसाम रायफलमध्ये भरतीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक

कोल्हापूर - ‘आसाम रायफल’मध्ये भरतीच्या आमिषाने कोल्हापूरसह सांगली, कर्नाटकातील तरुणांची फसणूवक झाली आहे. यात तब्बल सात-आठशे तरुणांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शी दिसते. प्रत्येक तरुणाकडून तब्बल अडीच ते पाच लाख रुपये एजंटांच्या साखळीने घेतल्याचे सांगण्यात येते. ही फसवणूक केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित नसून ती परराज्यांपर्यंत पोचली आहे.

सैन्यात भरती होण्यासाठी उत्सुक असलेल्या कोल्हापुरातील ग्रामीण भागासह सांगली आणि कर्नाटकातील तरुणांना भामट्यांच्या टोळीने फसवले आहे. जानेवारी २०१८ ते जून २०१८ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. या सर्वाना विमान प्रवास, लॉजमध्ये राहणे, यासह इतर खर्चही करण्यासाठी या टोळीने भाग पाडले आहे. यात तरुणांची दुहेरी फसवणूक झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, भुदरगड, शाहूवाडी येथील काही तरुणांचा यात समावेश आहे, तर टोळीतील काही तरुणही याच भागातील आहेत. आसाममध्ये भरती प्रक्रियेसाठी घेऊन जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील ‘महावीर गार्डन’ मध्ये या तरुणांचे फॉर्म भरून घेतले, त्यानंतर त्या सर्वांकडून 
प्रत्येकी अडीच ते पाच लाखांपर्यंत रक्कम घेतली आहे. काहींनी केवळ तोंडी चर्चा करून, काहींनी रोख स्वरूपात हे पैसे दिले आहेत. काहींनी सर्व कॉल रेकॉर्डिंग केले आहेत. काहींनी फोटो काढले आहेत, तर काही तरुणांकडे लिहून दिलेला स्टॅम्पही असल्याचे सांगण्यात येते. 

सहा महिन्यांत दुहेरी फसवणूक
कोल्हापुरातून गुवाहाटीपर्यंत तरुणांना त्यांच्या खर्चाने नेले. साधारण सहा महिन्यांच्या या कालावधीत तरुणांना प्रत्येकी लाख रुपयांचा जादा भुर्दंड बसला आहे. तरुणांना भरतीच्या आमिषाने दिलेल्या रकमेपेक्षा हा खर्च वेगळा असल्यामुळे सहा महिन्यांत तरुणांची दुहेरी फसवणूक झाली आहे.

एजंटांची साखळी
‘आसाम रायफल’मध्ये भरती करतो, असे सांगून कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातील तरुणांना एकत्रित करण्यात आले. यासाठी त्यांनी एजंटांची साखळी तयार केली. ही साखळी कोल्हापुरातील ग्रामीण भागापासून पुढे सांगली आणि गुवाहाटीपर्यंत पोचल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक ठिकाणी तरुणांना पुढे नेण्यासाठी स्वतंत्र एजंट होता. जागा बदलली की एजंट बदलत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com