भामटे सुसाट; फसणारे आतबट्ट्यात...

भामटे सुसाट; फसणारे आतबट्ट्यात...

कोल्हापूर - ‘तुमच्या मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, कमी व्याजदराने सहज गृहकर्ज देतो, अल्पावधीत रक्कम दामदुप्पटसह मोफत आरोग्य सुविधा देतो, अशी वेगवेगळी आमिषे दाखवून भामटे रोज रोज सामान्यांना गंडा घालू लागलेत. कारवाईअभावी भामट्यांच्या संख्येत भरच पडू लागली आहे. एखादी कंपनी सुरू करायची. त्याची जाहिरात द्यायची.

कंपनीत पैसे गुंतवा, आठ-नऊ वर्षांत रक्कम दुप्पट देऊच, त्याचबरोबर मोफत वैद्यकीय सुविधाही देऊ, असे आमिष दाखवून दाभोळकर कॉर्नर परिसरात कंपनी सुरू झाली. या कंपनीत गुंतवणूक केलेल्या अनेक गुंतवणूकदारांना कंपनीने लाखोंचा गंडा घातला. 

त्यातील काही गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात १७ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. लक्ष्मीपुरीतील एका भामट्याने कमी व्याजदराने कर्ज मंजूर करून देतो, अशी आमिषे दाखवून २२ लाखांची फसवणूक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागासह शैक्षणिक संस्थेत नोकरीच्या आमिषाने कागल येथे भामट्याने बनावट दस्ताऐवज करून २१ लाखांचा गंडा घातला. इतकेच नव्हे तर नागपूर उपविभागीय अधिकारी असल्याचे भासवून भामट्याच्या सात जणांच्या टोळीने नोकरीच्या आमिषाने सुमारे २०० जणांना कोट्यवधीचा गंडा घातला. त्यातील सात जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. यात भामट्याच्या टोळीने शासकीय अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी चक्क मोटारीवर चक्क लाल दिव्याचा वापर केला होता, हे तपासातून पुढे आले. ही झाली १५ दिवसांतील भामट्यांची प्राथमिक उदाहरणे. 

आलिशान मोटार, उंची कपडे, किमती गॉगल, सोन्याचे दागिने सोबतीला सुरक्षारक्षकांचा गराड्यातून आधार भामट्यांकडून घेतला जात आहे. ते वक्तृत्व कौशल्याचा वापर करून सावज शोधून त्याची शिकार करू लागले आहेत. यात महिला भामट्यांचीही संख्या वाढू लागली आहे. आमिषाला बळी पडण्यात सामान्यांचीच संख्या अधिक आहे. यामागे मोठी टोळी असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र, तोटक कारवाईमुळे भामटे मात्र सुसाट असल्याचे चित्र आहे.

नागरिकांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये. ऑनलाईन व्यवहार करण्यापूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच फसवणूक झाल्यास तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.
- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com