cheating of fourty thousand by duplicate ATM card case filed 
cheating of fourty thousand by duplicate ATM card case filed 

बनावट ए.टी.एम. कार्डव्दारे 40 हजारांची फसवणूक; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) : येथील शेतकरी सुभाष जगन्नाथ कुंभार (वय 44) याचे बेगमपूर येथील भारतीय स्टेट बँकेतून अज्ञात इसमाने ऑनलाईन 40 हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी सुभाष कुंभार हा ब्रम्हपुरी येथील शेतकरी असून त्याच्या शेतीमधून विद्युत टॉवरलाईन गेल्याने त्याच्या नुकसान भरपाईपोटी 40 हजार रुपये मिळाले होते. ही रक्कम कुंभार यांनी बेगमपूर शाखेच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यावर जमा केली होती. दि. 1 व 2 फेब्रुवारीला प्रत्येकी 20-20 हजार रुपये असे 40 हजार रुपये काढल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला. यानंतर या घटनेबाबत बेगमपूर येथील सदर बँकेकडे अधिक चौकशी केली मात्र योग्य माहिती व वस्तूस्थितीदर्शक माहिती मिळू न शकल्याने फिर्यादीने मंगळवेढा पोलिसात याबाबतचा तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ केली व 5 महिन्यानंतर पोलिसांनी कुंभार यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय गोवे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com