कोल्हापूरः हालोंडी, हेर्लेत भामट्याने लावला दीड कोटीला चुना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

नागाव -  कमी किमतीत सोने देतो असे सांगून हालोंडी (ता. हातकणंगले) येथील भामट्याने सुमारे पंधरा जणांना दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे आणि सोने दोन्हीपैकी काहीच मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

नागाव -  कमी किमतीत सोने देतो असे सांगून हालोंडी (ता. हातकणंगले) येथील भामट्याने सुमारे पंधरा जणांना दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे आणि सोने दोन्हीपैकी काहीच मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. कमी किमतीत सोने खरेदी करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गोळा केली. त्यामुळे तुमचीच उलटी चौकशी लावतो, असे सांगून भामटा संबंधित व मध्यस्थी गुंतवणूकदारांना सहा महिन्यांपासून टोलवत आहेत. 

याबाबतची माहिती अशी : हालोंडी येथील एका तरुणाने तेथीलच एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये छोटा व्यवसाय सुरू केला. यातून तो एका बॅंक अधिकाराच्या संपर्कात आला. ओळखीतून त्याला बॅंक लिलावातील सोने कमी किमतीत मिळाले. हेच सोने त्याने संबंधित खासगी सावकाराला दिले. त्यामुळे त्याचा गैरप्रसार सुरू झाला. यातून काहींनी स्वतःहून त्याच्याकडे रक्कम देत पुढच्या लिलावातील सोने आम्हाला दे, असे सांगितले. याचा गैरफायदा घेत भामट्याने गुंतवणूकदारांच्या संबंधित व्यक्तींना गंडा घालण्यास सुरुवात केली.

हालोंडी व हेर्ले येथील सुमारे पंधरा जणांनी कमी किंमतीतील सोने मिळविण्यासाठी दीड कोटीची गुंतवणूक केल्याचे समजते; पण एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कोठून आली, याबाबत आपली चौकशी होईल या भीतीने ते केवळ मध्यस्थीच्या माध्यमातून आपले पैसे किंवा सोने परत मिळेल, या आशेवर आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating incidence in Halondi and Herle