स्वतःच्याच मृत्यूच्या जाहिराती करून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

इचलकरंजी - शासकीय अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक प्रकरणातील संशयित प्रकाश कैलास पाटील (वय ३४, रा. सांगली) याचे अनेक कारनामे पोलिस तपासात उघडकीस येत आहेत. 

स्वतः मृत झाल्याचे भासवत त्याने चक्क वृत्तपत्रातून स्वतःच्या श्रद्धांजलीची जाहिरात दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांकडून पोलिसांत तक्रार दाखल केली जाऊ नये, यासाठी त्याने ही शक्कल लढविल्याचे पोलिसांनी सांगितले.

शासकीय अधिकारी असल्याचे भासवून नोकरी व कर्ज देण्याचे आमिष दाखवून संशयित पाटील याने कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर येथील नागरिकांची फसवणूक केली आहे. 

हातकणंगले पोलिसांनी एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यामुळे फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात येऊन त्याच्याबाबत माहिती घेतली. यात पन्हाळा, मिरज व शिराळा तालुका येथील नागरिकांना पाटील याने वेगवेगळ्या नावाचा वापर करून सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लुबाडल्याचे निष्पन्न झाले आहे. 
पाटील याने केलेल्या फसवणूक प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. यामुळे पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. यापूर्वी त्याने फसवणूक करताना वेगवेगळ्या पद्धती वापरल्या होत्या. आता आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. पूर्वी पाटील याचे आडनाव इंडी असे होते. त्याने प्रतिज्ञापत्र करून आडनाव बदलून घेतल्याचे पुढे आले आहे. 

२०११ मध्ये त्याने अपघातात आपला मृत्यू झाल्याचे भासवून आपलीच श्रद्धांजलीची जाहिरात प्रसिद्धीस दिली होती. या प्रकाराने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

फसवणूक केलेल्यांना पत्र
पाटील याने अनेकांची फसवणूक केली आहे. अशा फसवणूक केलेल्यांच्या पत्त्यावर तिऱ्हाईत व्यक्तींच्या नावे पत्र पाठवून फसवणूक करणारा मृत झाल्याचे कळवीत होता. यामुळे फसवणूक झालेले नागरिक पोलिसांत तक्रार करण्यास जाऊ नयेत, असा त्याचा उद्देश होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांतून देण्यात आली.

Web Title: Cheating by the proportion of its own death