सोशल मिडीयावर चॅटिंग अन् गिफ्टच्या आमिषाने 9.68 लाखांची फसवणूक

cheating of ten lakh by telling bait of gift on social media at solapur
cheating of ten lakh by telling bait of gift on social media at solapur

सोलापूर : फेसबुकवर मैत्री करून महिलेचा व्हॉट्‌स ऍप क्रमांक मिळविला. चॅटिंग करून लंडनमधून खास गिफ्ट पाठविल्याचे कळविले. ते गिफ्ट मिळविण्यासाठी टप्याटप्यात 9 लाख 68 हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून घेतले. शेवटी संशय आल्याने याबाबत मित्रांना सांगितले आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

वैशाली लक्ष्मण शिंदे (वय 38, रा. पत्रकार नगर, यशोधन बंगला, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या शासकीय रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्या पतीचे पंढपुरात पॅथॉलॉजी लॅब आहे. ऍलआंडर स्टीव्ह (वय 35, रा. लंडन) असे आरोपीचे नाव आहे. 7 मे 2019 ला आरोपी स्टीव्ह याने वैशाली यांना फेसबुकवरून फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली. वैशाली यांनी ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर स्टीव्ह याने वैशाली यांचा व्हॉट्‌सऍप क्रमांक घेतला. व्हॉट्‌सऍपवर चॅट करून मी तुम्हाला गिफ्ट पाठवले आहे असे सांगितले. वैशाली यांनी मला गिफ्ट नको असे कळविले. त्यानंतर परदेशातल्या मोबाईल क्रमांकावरून वैशाली यांना फोन आला. तुमच्या पत्त्यावर गिफ्ट पाठविल्याचे कळविले. 13 मे ला एकाने फोन करून तुमचे गिफ्ट दिल्ली एअरपोर्टवर आले असून ते गिफ्ट मिळवण्यासाठी 35 हजार रुपये ट्रान्स्पोर्ट चार्जेस भरावे लागतील असे कळविले. त्यानंतर वैशाली यांनी बॅंकेच्या खात्यावर 35 हजार रुपये पाठवले. तुमचे आलेले गिफ्ट आम्ही उघडून पाहिले आहे, त्याच्यामध्ये 60 हजार पाउंड इतकी रक्कम आहे. ते मिळविण्यासाठी तुम्हाला आणखी 87 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगून पैसे मागून घेतले. वैशाली यांना आरबीआयच्या नावाने बनावट ईमेल पाठविला. वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे काढून घेतले. 

तुमच्या पैशांबाबत तिकडे तक्रार आली आहे, असा फोन 30 मेला आला. भीती दाखवून आणखी पैसे घेतले. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असे लिहिलेला ईमेलही वैशाली यांना आला. शेवटी वैशाली यांनी याबाबत मित्रांना माहिती दिली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वैशाली यांनी बाजार पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट तपास करीत आहेत. 

सावधान... 
अशाप्रकारे ऑनलाइन माध्यमातून कोणीही गिफ्ट किंवा पैशांचे आमिष दाखवल्यानंतर आपली वैयक्तिक देवू नका. पैसेही भरू नयेत. आजवर अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाली आहे. नागरिकांनी अशाप्रकारचे संशयित फेसबुक आणि व्हाट्‌सऍप​ अकाउंट ब्लॉक करावेत, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com