नुकसानीची पाहणी ड्रोनने करा : विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी तातडीने निर्णय घेतले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना गावपातळीवर पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवावा. शक्‍य असेल तर नुकसानीची पाहणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा,'' अशी सूचना गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

नगर : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी तातडीने निर्णय घेतले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना गावपातळीवर पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवावा. शक्‍य असेल तर नुकसानीची पाहणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा,'' अशी सूचना गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

विखे पाटील यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ते म्हणाले, "अधिकाऱ्यांच्या कामावरच शासनाची प्रतिमा अवलंबून आहे. काही गावांत पंचनामे करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश कृषी व महसूल विभागाला दिला आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Check the agriculture loss with Drones says Vikhe Patil