शंभुराजेंना विविध उपक्रमांनी अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

सांगली - शहर व परिसरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी झाली. शहरात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सोशल ग्रुप, मराठा परिवार, मराठा समाज तसेच विविध संघटनांतर्फे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सांगलीतील अजय चौकातर्फे संभाजी महाराजांची जयंती झाली. संजय साबणे, संदीप साळुंखे, गौरव साबणे, वैभव माळी, रोहित गणबावले, तुषार ठाणेकर आदी उपस्थित होते. 

मराठा समाज संस्थेतर्फे संभाजी महाराज जयंती उत्साहात झाली. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राविषयी माहिती दिली. सरचिटणीस सुधीर सावंत, आर. एस. पाटील, तानाजीराव मोरे, डॉ. मोहन पाटील आदी उपस्थित होते. 

"मराठा क्रांती' तर्फे बिसूरला अभिवादन 
बिसूर - मराठा क्रांती मोर्चातर्फे संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी सैनिक विलास जमदाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील, अनिल पाटील, सुभाष पाटील, गोपाळ पाटील, मोहन पाटील, अनिकेत पाटील, केशव पाटील, हणमंत पाटील, सार्वजनिक कुमार वाचनालयाचे ग्रंथपाल विजय पाटील, सदाशिवभाऊ पाटील आदी उपस्थित होते. 

आष्ट्यात संभूराजे ग्रुपतर्फे संभाजीराजेंना अभिवादन 
आष्टा : चव्हाणवाडी येथे शंभूराजे ग्रुपतर्फे संभाजी महाराजांची जयंती झाली. चव्हाणवाडीत उभारलेल्या पुतळ्याचे पोलिस उपाधीक्षक प्रशांत ढोले यांच्या हस्ते पूजन झाले. 

श्री. ढोले म्हणाले,""छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शंभूराजेंनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. ते धर्म व नीतिशास्त्रात पारंगत होते. तरुणांनी शंभूराजांच्या खऱ्या इतिहासाचे वाचन, मनन करावे.'' 

शहरातील प्रमुख मार्गावरून मिनी डॉल्बी व दांडपट्टा पारंपरिक वाद्यांच्या गजरात संभाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक निघाली. माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध, शिवसेनेचे नेते वीर कुदळे, नगरसेवक अर्जुन माने, प्रा अमित ढोले, माजी नगराध्यक्ष जानकास ढोले, पिंटू मेथे, दत्ता कोळेकर, दीपक ढोले, सागर सिद्द, पिंटू नरुले, रवी माळी, सुधीर कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti