esakal | "कडकनाथ'विरुद्ध छत्तीसगडच्या तरुणांची तक्रार 
sakal

बोलून बातमी शोधा

"कडकनाथ'विरुद्ध छत्तीसगडच्या तरुणांची तक्रार 
  • कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या साखळीची व्याप्ती आंतरराज्य असल्याचे आज उघडकीस
  • छत्तीसगड येथील दोन तरुणांनी फसवणूक झाल्याची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार.
  • निलू घोष (रा. विलासपूर) आणि पवनकुमार साहू (दुर्ग बिलाई), अशी त्यांची नावे. 

"कडकनाथ'विरुद्ध छत्तीसगडच्या तरुणांची तक्रार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या साखळीची व्याप्ती आंतरराज्य असल्याचे आज उघडकीस आले. छत्तीसगड येथील दोन तरुणांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. निलू घोष (रा. विलासपूर) आणि पवनकुमार साहू (दुर्ग बिलाई), अशी त्यांची नावे आहेत. आपण कसे फसलो, याचा उलगडा त्यांनी पत्रकारांसमोर केला. 

इस्लामपुरातून नियंत्रित झालेला कडकनाथ घोटाळा कोट्यवधी रुपयांचा आहे. त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागातील शेकडो तरुण फसले आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक करून आता त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यात छत्तीसगडमधील तरुण शेतकरीही बळी पडल्याचे स्पष्ट झाले.

पवनकुमार साहू म्हणाले, ""आम्ही तेथे शेती करतो. शेतीला पूरक व्यवसाय करण्याचा विचार करत असताना "यू-ट्यूब'वर कडकनाथ कोंबडीविषयीची माहिती मिळाली. येथील कार्यालयात आलो, चौकशी केली. त्यांनी काही फर्मवर नेले. शेतकऱ्यांशी चर्चा झाली. येथे एक युनिट 75 हजार रुपयांना विकत होते, आम्ही छत्तीसगडचे असल्याने एक लाख रुपयांची मागणी केली. आम्ही कबूल केले. एका युनिटमध्ये 120 पिले, खाद्य, औषधे व वैद्यकीय सेवा दिली जाणार होती. सुरवातीपासून चांगली सेवा मिळाली नाही. पैसे अडकून पडले होते. तीन महिन्यांपासून संपर्कही झाला नव्हता. संपर्कासाठी वेगवेगळे नंबर दिले जात होते. परवा "यू ट्यूब'वर या प्रकरणात फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली आणि इकडे आलो.''

ते म्हणाले, ""आमच्यासोबत आणखी काही लोक येणार होते; मात्र त्यांच्या पोल्ट्रीतील कोंबड्या मरू लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ते परत गेले. खाद्याची कमतरता आहे. अंडी कोण घेणार, हे माहिती नाही. आमची फसगत झाली आहे.'' 

loading image
go to top