शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडणुकीत विजयी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अलीकडेच अपशब्द उच्चारणारा आणि नगर शहरातून तडीपार असलेला श्रीपाद छिंदम महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायकरित्या विजयी झाला.

मतमोजणीच्या पहिल्या तीन ते चारपर्यंत फेरीपर्यंत छिंदम पिछाडीवर होता. नंतर त्याने आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत राखत त्याने विजय मिळविला. छिंदम प्रभाग क्रं. 9 (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष निवडणूक लढवत होता. या मतदारसंघात चार फेऱ्यानंतर मनसेचे पोपट पाथरे यांनी पाचशे मतांची आघाडी घेतली होती. मात्र, नंतर सहाव्याफेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली. ती तेराव्या फेरीनंतर 1850 मतांपर्यंत पोचली. 

येथून राष्टूवादीच्या अनिता राठोड, शिवसेनेचे सुरेश तिवारी, भाजपचे प्रदीप परदेशी, मनसेचे पोपट पाथरे व अपक्ष प्रवीण जोशी, नीलेश म्हसे, अजयकुमार लयचेट्टी हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Web Title: Chhindam wins Ahmednagar Municipal Election