महायुतीकडून कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कळंबा येथे आयोजित सभेत केले.

कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कळंबा येथे आयोजित सभेत केले.

महाजनादेश यात्रा कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरुन हॉकी स्टेडियम मार्गे कळंबा येथे आली. येथे चांदीची गदा आणि छत्रपती शिवरायांचा पूतळा भेट देऊन स्वागत करण्यात आले. पुन्हा भाजप महायुतीचाच झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन जनतेसमोर येणारे पहिलेच सरकार आणि पहिलाच मुख्यमंत्री असल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला आशीर्वाद द्या, कोल्हापूरकरांनीही भव्य दिव्य स्वागत केले. पाच वर्षांत आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन हे सरकार लोकांसमोर जात आहे. त्यामुळे केंद्रात मोदींच्या नेतृत्वाला आणि राज्यात माझ्या नेतृत्वाला आशीर्वाद देणार की नाही. तुमचा जनादेश आहे की नाही? अशी विचारणा त्यांनी उपस्थित लोकांना केली. गर्दीनेही आहे असे उत्तर दिले. त्यानंतर तुमचा आशीर्वाद चंद्रकांत पाटील यांना आहे का? अमल महाडिक यांना आहे का? अशी विचारणा मुख्यमंत्री समुदायाला करत होते. त्यावेळी उपस्थितांतून आहे, आहे असा प्रतिसाद मिळाला.

मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, बाबा देसाई उपस्थित होते. 

कळंबा येथे उर्त्स्फूत स्वागत 
कळंबा येथे सकाळी दहा वाजल्यापासून सुर्यकांत मंगल कार्यालयाजवळ ग्रामस्थांची तसेच भाजप कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. भगवे फेटे घालून उपस्थित कार्यकर्ते महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. बारा वाजता महाजनादेशयात्रा कळंबा येथे आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच भारत माता की जय, जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्या. उपस्थितांनीही त्यांना चांगलीच दाद दिली. त्यामुळे वातावरण भाजपमय झाले होते. सर्वांच्या हातात कमळ चिन्ह असलेले भगवे ध्वज डोलत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra comment in Mahajanadesh Yatra