मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी राळेगणमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी राळेगणमध्ये

राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिलस आहे‌. त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन आज दुपारी एक वाजता राळेगणसिद्धीला पोचणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री राळेगणमध्ये पोचणार असल्याने प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांचा स्थानिक पोलिसांचा त्यामध्ये समावेश आहे. सर्वच विभागाचे अधिकारीही राळेगणमध्ये पोहोचणार आहेत. दरम्यान अण्णांच्या समर्थनार्थ आज राज्यभरातून कार्यकर्ते राळेगणसिद्धीमध्ये पोहोचले आहेत.

या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या निर्णयांकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान दुपारी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीयमंत्री मागण्यांबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती अण्णांना  देतील. या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस स्वतः ग्रामसभेला देणार आहेत. त्यानंतर उपोषण थांबण्याची दाट शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com