मुख्यमंत्री म्हणाले, वस्त्रोद्योग धोरणातील त्रुटी दूर करणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

इचलकरंजी - वस्त्रोद्योगाच्या धोरणातील सर्व त्रुटी दूर करून राज्यातील या व्यवसायाला पुन्हा एकदा भरभराटी आणू अन् इचलकरंजी देशातील उद्योगाचे अव्वल केंद्र बनवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज येथे केली. 

इचलकरंजी - वस्त्रोद्योगाच्या धोरणातील सर्व त्रुटी दूर करून राज्यातील या व्यवसायाला पुन्हा एकदा भरभराटी आणू अन् इचलकरंजी देशातील उद्योगाचे अव्वल केंद्र बनवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज येथे केली. 

महाजनादेश यात्रेनंतर येथील थोरात चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर आदी उपस्थित होते. श्री फडणवीस म्हणाले वस्त्रोद्योग धोरणात आघाडी सरकारने मोठे बदल केले आहेत. त्यातून या व्यवसायाला अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही काही कमतरता असल्यास त्या तातडीने दूर केल्या जातील.

आमदार हाळवणकर यांनी शहराच्या विकासासाठी सर्वाधिक निधी फडवणीस यांच्या नेतृत्वातील सरकारने दिल्याचे सांगून वस्त्रोद्योगाला नक्कीच आगामी काळात मोठ्या सवलती मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी आजच्या महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत अभूतपूर्व असल्याचे सांगून लोकांचा जनादेश पाहता याठिकाणी भाजपला विक्रमी मते पडतील, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान शहरात सुमारे एक तासाहून अधिक काळ ठिकठिकाणी यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले तब्बल तीन किलोमीटरहून अधिक मार्गावर नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis comment on Ichalkaranji