आपत्ती काळात भाजपकडून पाचपट मदत 

आपत्ती काळात भाजपकडून पाचपट मदत 

जयसिंगपूर - महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येईल. येत्या पाच - सहा वर्षात हे काम मार्गी लागल्यानंतर पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुटपुंजी मदत केली. भाजपने मात्र पाचपटीने अधिक मदत दिली आहे. जागतिक बॅंक आणि शासनाच्या पथकाकडून पूरभागाची पाहणी करण्यात आली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल. पुन्हा एकदा भाजपला साथ द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

महाजनादेश यात्रेचे प्रथम आगमन जयसिंगपूर शहरात झाले. यावेळी ते बोलत होते. उदगाव येथे यात्रेचे आणि मुख्यमंत्र्यांचे स्वागत आमदार उल्हास पाटील यांनी केले. त्यानंतर उदगांव येथून ही यात्रा जयसिंगपूर येथील क्रांती चौकात आली. नगरपालिका चौकात आल्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, "पाच वर्षात सरकारने काय - काय केले याचा लेखा - जोखा घेऊन महाजनादेश यात्रा काढली आहे. भाजप सरकार हे केंद्रांत आणि राज्यात केलेले काम हे जनतेच्या समोर आहे. सध्या सुरु असलेली यात्रा ही प्रत्येक लोकापर्यंत पोहचून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी काढली आहे.' 

तुमचा आशिर्वाद पंतप्रधान मोदींना, मला, चंद्रकांत पाटील, सुरेश हाळवणकर, धनंजय महाडिक यांना आहे का, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमावाकडून कबुल करुन घेतले. तुमचा आशिर्वाद असेल तर मी मुंबईला जातो, आणि परत भाजप युतीचा झेंडा राज्यात फडकवतो. यामुळे शिरोळ तालुक्‍याने अशीच साथ द्यावी, असे त्यांनी सांगितले. 

मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, बाबा देसाई, धनंजय महाडिक, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, अनिलराव यादव, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, निता माने, रजनीताई मगदूम, मुकूंद गावडे, हिंदुराव शेळके, रामचंद्र डांगे, विजय भोजे, मिलिंद भिडे, सोनाली मगदूम आदी उपस्थित होते. 
 
स्वाभिमानीचे अंडीफोड आंदोलन 
उदगांव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजन यात्रा येत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रश्नी निषेध करत या यात्रेवर अंडीफोड आंदोलन केले. त्याचबरोबर साखर कारखान्यांची स्थगिती हटवा यासाठी आंदोलन अंकुशकडून मुख्यमंत्र्यांना रोखण्यात येणार होते, मात्र, सोमवारी सकाळीच आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com