मुख्यमंत्री 17 तारखेला पंढरपुरात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पंढरपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. 17) सोलापूरला येत असून, त्यांच्या हस्ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या भक्त निवास इमारतीचे व तुळशी वनाचे उद्‌घाटन होणार आहे. 

नवी मुंबईचे शिवसेना नगरसेवक व "मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी राज्यस्तरीय वडार समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 

विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे 75 कोटी रुपये खर्च करून 300 खोल्यांचे भक्त निवास उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर वन विभागाने दोन एकर जागेवर पद्मावती तलावाजवळ सुमारे 8 कोटी रुपये खचूर्न "तुळशी वनाची' निर्मिती केली आहे. या वनात विविध संतांच्या भव्य शिल्पाकृती साकारण्यात आल्या असून, पंढरीत येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी ते आकर्षण ठरणार आहे. 

Web Title: Chief Minister of Pandharpur on 17 Dec