मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

सांगली : पालिकेचं रणांगण तापलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे हा दौरा पुढे गेला असून येत्या सोमवारी (ता. 30) हा सांगली दौरा होईल, अशी भाजप सुत्रांकडून माहिती मिळते आहे. 

सांगलीतील वाळवा तालुक्‍यातील आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री उद्या (ता.27) सांगली दौऱ्यावर होते. त्यानंतर ते सांगलीत प्रचारासाठी येणार असल्याची माहिती भाजपने दिली होती. मात्र, राज्यात मराठा आंदोलनामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून येत्या सोमवारी (ता.30) मुख्यमंत्र्यांचा दौरा होईल, अशी माहिती भाजप सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार की नाही, याबाबतची उत्सुकता सांगलीकरांमध्ये आहे. 

Web Title: chief minister s sangali tour cancel