चिकुनगुण्या, डेंगीचा धोका

Dengue
Dengue

सांगली - जिल्ह्यातील ३६ गावे डेंगी, चिकुनगुण्या आणि हिवताप संवेदनशील आहेत. यापैकीच पलूसमध्ये काल डेंग्यूने एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. केवळ ३६ गावांतच नव्हे तर त्याहून अधिक गावात डासांचे प्रमाण वाढले आहे. तेथे डेंगी, चिकुनगुण्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने केवळ कागदे न रंगवता प्रत्यक्ष गावागावात जाणून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असताना हिवतापाचे  रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

मात्र ग्रामीण आणि शहरी भागात डेंग्यू व चिकुनगुण्याचे रुग्ण मिळत आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुण्या आजार विशिष्ट विषाणूमुळे होतो. ‘एडीस इजिप्टाय’ नावाच्या टायगर मास्क्‍युटो डासांमुळे याचा प्रसार झपाट्याने होतो. डेंग्यू, चिकुनगुण्या आणि हिवतापाची लागण होऊ शकते अशी ३६ संवेदनशील गावे आरोग्य विभागाकडे नोंद आहेत. ३६ गावांमध्ये पलूसचा समावेश आहे. काल तेथे डेंग्यूने एका रुग्णाचा बळी गेला. एकीकडे कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोहीम राबवत असताना रुग्णाचा बळी गेल्यामुळे आरोग्य विभाग निद्रिस्त आहे की काय? अशी शंका येते. 

डेंग्यू, चिकुनगुण्याचे रुग्ण वाढले-
गतवर्षी ३३३ लोकांचे रक्तजल नमुने घेतल्यानंतर ५८ डेंग्यूचे रुग्ण आढळले. यंदा मे २०१८ अखेर ११७ जणांची तपासणी केल्यानंतर २६ डेंग्यू रुग्ण आढळले. चिकुनगुण्या तपासणीसाठी गतवर्षी २१४ नमुने घेतले. त्यात ६३ रुग्ण आढळले. यंदा मे अखेर १०८ नमुने तपासल्यानंतर ३७ जणांना चिकुनगुण्या झाल्याचे आढळले.

संवेदनशील गावे-
काकडवाडी, म्हैसाळ, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, समडोळी, आसंगी तुर्क, बेवनूर, जत, यमगरवाडी, वासुंबे, मांजर्डे, मणेराजुरी, येळावी, बागणी, आष्टा, इस्लामपूर, शिरसी, आंबेवाडी, शिराळा, मणदूर, जांभुळवाडी, कवठेमहांकाळ, ढालगाव, साळशिंगे, विटा, खानापूर, येवलेवाडी, आमरापूर, कडेगाव, नेवरी, शिरसगाव, आंधळी, पलूस, शेटफळे, खरसुंडी, विभुतवाडी.

डासांची घनता अधिक असलेली गावे
अमरापूर, भिलवडी, अंकलखोप, नांद्रे, कसबे डिग्रज, जत, मणेराजुरी, येळावी या आठ गावांत डासांची घनता दहापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com