बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाचीही आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

कोडणी येथील तीन वर्षाची बालिका शुक्रवारपासून बेपत्ता होती.  तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण ती आढळून आली नाही. बालिकेच्या घरापासून केवळ शंभर मीटर अंतरावर कुमार माने याचे घर आहे. नेहमी ही बालिका त्यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात होती.

निपाणी ( बेळगाव ) - कोवळ्या तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून नराधमाने बालिकेचा खून केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही घटना कोडणी (ता. निपाणी) येथे सोमवारी (ता. 25) सकाळी उघडकीस आली. कुमार रानोजी माने (वय 50  रा. कोडणी) असे या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे कोडणीसह निपाणी परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेमुळे कोडणीसह परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, कोडणी येथील तीन वर्षाची बालिका शुक्रवारपासून बेपत्ता होती.  तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण ती आढळून आली नाही. बालिकेच्या घरापासून केवळ शंभर मीटर अंतरावर कुमार माने याचे घर आहे. नेहमी ही बालिका त्यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात होती. शुक्रवारी सायंकाळी परत न आल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध करूनही ती सापडली नव्हती. अखेर संशयित आरोपी कुमार माने याने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांच्या सहकार्याने कुमार यांच्या घराचे दरवाजे उघडले. तेव्हा आत्महत्या केलेल्या घरातच पलिकडच्या बाजूलाच बालिका निपचित पडली होती.

हेही पाहा -  ट्रकवर वाळू उतरवण्याचे काम करणाऱ्यांनी कशा केल्या २४ घरफोड्या ? वाचा 

पत्नीचीही पेटवून आत्महत्या

कुमार हा विवाहित आहे. त्याला दोन अपत्ये आहेत. पण काही वर्षापूर्वी त्याच्या पत्नीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. काैटुंबिक वादातून तिन आत्महत्या केली होती. त्यामुळे कुमार हा एकटाच घरी राहात होता. शुक्रवारी संबंधित बालिका टीव्ही पाहण्यास आल्यावर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच मंडळ पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. बालिकेसह कुमार माने याचा मृतदेह येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. येथील गांधी हॉस्पिटलसमोर मृत बालिकेच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. 

हेही पाहा - चंदगड नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक डिसेंबरमध्ये शक्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Abuse And Murdered Incidence In Kodani Nipani