बालविकास एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या योजनांचा खेळखंडोबा

बालविकास एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या योजनांचा खेळखंडोबा

मंगळवेढा - एकात्मिक बालविकास कार्यालयातील बालविकास अधिकाऱ्याचे पद रिक्त होवून दोन वर्षे झाली तरी प्रभारीवर या कार्यालयाचा कारभार सुरुच आहे. या खात्याच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेचा मात्र खेळखंडोबा होत चालला आहे. मंजूर अंगणवाडीची कामे आचारसंहितेत अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या आखत्यारित तालुक्यात 264 बालवाडया असून, त्यामध्ये 212 मोठया तर 52 मिनी अंगणवाडया आहेत. तालुक्यातील बालकाच्या सर्व्हेनुसार 8904 पट 7484 असून, प्रत्यक्षात उपस्थिती 5508 इतकी आहे. सध्या तालुक्यातील 160 अंगणवाडयाला इमारत असून 52 अंगणवाडयाला अजून इमारत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना या मुलांना पाऊस, ऊन वारा यांचा सामना करत शिकवावे लागत आहे. याशिवाय वाडीवस्तीवरील बालकांना घराजवळ शाळा व्हावी म्हणून तालुक्यातील वाडीवस्तीवर सुरु केलेल्या 52 पैकी 51 अंगणवाडयात निवाय्राचा अभाव आहे. मंजूर इमारतीची कामास शासकीय फितीत अडकले.

यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही. निविदा प्रक्रियेबाबत टोलवा टोलवीसी होत आहे. यामुळे चिमुकल्याच्या आयुष्याशी खेळ सुरु आहे. बालकाला मिळणाऱ्या सुविधाची अमंलबजावणी करण्यासाठी मुख्य अधिकारीच नसल्यामुळे कोण पाहणी करणार गटविकास अधिकारी यांना त्याचा कारभार पाहून याकडे लक्ष देताना दमछाक होत आहे. गरोदर माताना गरोदर काळात योग्य सकस आहार देखील या अंगणवाडयातून दिला जातो. पण इमारत नसलेल्या ठिकाणी आहार उघडयावर ठेवावा लागतो तर बालकांचा पोषण आहार देखील उघडयावर ठेवून उघडयावर शिजवून दयावा लागतो. तपासणीसाठी येणारे कर्मचारी योग्य असणारे अधिकारीही सर्व काही योग्य असल्याचे सांगत असल्याने कुणाचा कुणाला मेळ नसल्याची चर्चा सुरू झाली.

चोखोमेळा नगरमध्ये मंजूर अंगणवाडीचे मंजूर काम निविदा प्रक्रियेत अडकावले असून आचारसंहीता जाहीर होण्यापुर्वी मंजूरी न मिळाल्यास जुन पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. पावसाळ्यात पुन्हा गैरसोय होण्यापुर्वीच प्रशासनाने लक्ष द्यावे. 
- शंभुदेव कदम नागरिक चौखामेळा नगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com