सोलापुरात रोखला बालविवाह; 15 वर्षीय मुलीच्या लग्नाचा प्रयत्न

muslim
muslim

सोलापूर : होटगी रोड परिसरात महिला व बाल विकास विभागाने मुस्लिम कुटुंबातील बालविवाह रोखला. आई आजारी असल्याने 15 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरविण्यात आले होते. या प्रकरणात आईवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

बालविवाह होणार असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ऍड. विजय खोमणे आणि विजयपूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात, संरक्षण अधिकारी मिथुन पवार, चाइल्ड लाइनचे सदस्य स्वप्नील शेट्टी, स्वामी आणि पोलिसांच्या पथकाने होटगी रोड परिसरातील मुलीचे घर गाठले. 15 वर्षीय मुलीचे 20 जूनला लग्न होणार असल्याची माहिती समजली. पथकाने मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न करता येणार नाही असे सांगितले. जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, सदस्या सुवर्णा बुंदाले यांनी मुलीच्या आईची समजून काढून कायद्याची माहिती दिली. या प्रकरणात आईवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 

सोलापूर शहर आणि परिसरात कोणत्याही ठिकाणी 18 वर्षाच्या खालील मुलीचे लग्न करण्यात येत असेल तर तत्काळ पोलिसांना किंवा चाइल्ड लाइनच्या 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com