मुलगा होत नसल्याच्या आकसापोटी चुलतीने घेतला पुतण्याचा बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

कागवाड - मुलगा होत नसल्याच्या आकसापोटी निष्पाप बालकाची पाण्याच्या बॅरेलमध्ये बुडवून हत्या केल्याची घटना शेडबाळ येथे उघडकीस आली. कार्तिक राजू आलासे (वय २) असे या बालकाचे नाव असून त्याची चुलत चुलती जयश्री आलासे हिनेच त्याचा बळी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. जयश्री हिला दोन मुलीच असल्याने आकसापोटी कार्तिकचा बळी घेतल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शेडबाळ येथे आलासे कुटुंबियात भाऊबंदकीचा वाद सुुुरु आहे. त्यातून नेहमीच भांडणे होत असतात. शुक्रवारी कार्तिकचे वडील राजू आलासे व आई रुपा आलासे हे दोघे कार्तिकला त्याच्या आजीजवळ ठेवून मिरज येथील दवाखान्याला गेले होते. त्यांच्या घराशेजारीच जयश्री हिचे घर आहे. कार्तिकचे आई, वडील परगावी गेल्याची संधी साधून जयश्रीने झोपलेल्या कार्तिकला उचलून आणून आपल्या घरातील पाण्याने भरलेल्या बॅरेलमध्ये टाकून झाकण लावले. त्यानंतर तिने घरातील दिवे बंद करून पोबारा केला.

दरम्यान, कार्तिकच्या आजीला तो दिसेनासा झाल्याने चौकशी करुनही तो मिळून आला नाही. यावेळी जयश्रीचा पती बाहुबली हा घरी आल्यानंतर हातपाय धुण्यासाठी बॅरेलचे झाकण उघडताच कार्तिकचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्याने तात्काळ त्याला बाहेर काढून घटनेची माहिती शेजाऱ्यांना सांगितली. त्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली होती. त्याची माहिती कार्तिकच्या आई, वडिलांना दिल्यानंतर ते गावात परतल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी अथणीचे मंडळ पोलिस निरीक्षक एच. शेखराप्पा, फौजदार समीर मुल्ला यांनी भेट देऊन पंचनामा केला. कागवाड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Child Murder crime