राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 'स्त्रीजन्मा'चा वाढला टक्का

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सोलापूर : राज्यातील 14 जिल्ह्यांत स्त्रीजन्माचा टक्का वाढला आहे. केंद्र पुरस्कृत 'बेटी बचाओ-बेटी बढाओ' या योजनेमुळे हा बदल झाला असून या योजनेचा आता राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जालना व हिंगोली या दोन जिल्ह्यांत मात्र प्रमाण घटले आहे. 

सोलापूर : राज्यातील 14 जिल्ह्यांत स्त्रीजन्माचा टक्का वाढला आहे. केंद्र पुरस्कृत 'बेटी बचाओ-बेटी बढाओ' या योजनेमुळे हा बदल झाला असून या योजनेचा आता राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जालना व हिंगोली या दोन जिल्ह्यांत मात्र प्रमाण घटले आहे. 

जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांत 2015 पासून ही योजना राबविली जात आहे. ही योजना 2014-2017 या तीन वर्षांसाठी राबवायची होती. पहिल्या टप्प्यात 10 आणि नंतरच्या टप्प्यांत सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेची खात्री देणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांचा समावेश होता, आता केंद्र शासनाने या योजनेत महाराष्ट्रातील आणखीन 19 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये सातारा, धुळे, नांदेड, अकोला, मुंबई उपनगर, मुंबई शहर, वर्धा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे, नागपूर, रायगड, अमरावती, रत्नागिरी, नंदूरबार, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर यांचा समावेश केला आहे.

पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गर्भवती मातांची नोंदणी करणे, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती, मुलींचे वाढदिवस साजरे करणे, मुला-मुलींची संख्या सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे व मुलींच्या जन्मदराबाबत पथनाट्यांचे आयोजन या उपक्रमामुळे स्त्रीजन्माच्या दराचा टक्का वाढला आहे. 

पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांतील लिंगगुणोत्तर प्रमाण (एक हजार मुलांच्या मागे) 

बीड  922 
जळगाव  903 
नगर  907 
बुलढाणा 939 
औरंगाबाद  929 
वाशिम 906 
कोल्हापूर  893 
उस्मानाबाद  908 
सांगली 924 
परभणी  947 
लातूर  931 
सोलापूर  921 
पुणे  915 
नाशिक 918 
जालना 852 
हिंगोली 869

Web Title: Child rate have been increased in 14 Districts