आईच्या मृत्यूनंतर मुलाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

वाई - वयोवृद्ध आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज वाईत उघडकीस आली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

वाई - वयोवृद्ध आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज वाईत उघडकीस आली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

येथील धर्मपुरी पेठेतील पद्‌मावती अपार्टमेंटमध्ये कमल रुख्माकांत प्रभुणे (वय 85) व त्यांचा मुलगा संदीप (वय 48) राहात होते. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घरकाम करणाऱ्या महिलेने घराचा दरवाजा वाजवूनही उघडला न गेल्याने तिने खिडकीतून डोकावले. त्यावेळी संदीपने घरात दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचे लक्षात आले. अपार्टमेंटमधील नितीन जगताप यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी कमल या घरातील पलंगावर मृतावस्थेत आढळल्या. या दोन्ही घटनांची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असून सहायक फौजदार रवींद्र यादव तपास करीत आहेत. 

Web Title: Child Suicide After Mother Death

टॅग्स