मुळा डाव्या कालव्यात मुलगा वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

राहुरी फॅक्‍टरी (नगर) - मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात काळे आखाडा (ता. राहुरी) येथील सार्थक मधुकर डुकरे (रा. काळे आखाडा) हा आठ वर्षांचा मुलगा आज दुपारी वाहून गेला. कालव्याचे आवर्तन बंद करून मुलाची शोधमोहीम सुरू आहे. कालव्याच्या किलोमीटर क्रमांक चौदावर कालव्यात मुलगा पडल्याचे समजताच मुळा धरणाचे उपअभियंता श्‍यामराव बुधवंत यांनी दुपारी साडेतीन वाजता आवर्तन तात्पुरते बंद केले. नगरसेवक प्रकाश भुजाडी, आप्पासाहेब काळे, संदीप सांगळे, गोपीनाथ काळे व अन्य ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. नगर-मनमाड महामार्गाजवळ आकाश हॉटेलपर्यंत शोध घेण्यात आला; परंतु सायंकाळी उशिरापर्यंत सार्थक सापडला नाही.
Web Title: The child was carried away in the left canal

टॅग्स