मैदाने ओस पडली, मामाचा गाव हरवला...

अक्षय गुंड 
सोमवार, 4 जून 2018

उपळाई बुद्रूक (सोलापूर) - लहान मुलांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, शैक्षणिक बदलामुळे उन्हाळ्या सुट्टीतही घेतल्या जाणाऱ्या परिक्षा तसेच युवा पिढीला मोबाईल, कॉम्प्युटर व सोशल मिडीयाचे लागलेले व्यसन यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत 'मामाचा गाव' हरवत चालले असुन, जुने पारंपारिक खेळही हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसुन येत आहे. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) - लहान मुलांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, शैक्षणिक बदलामुळे उन्हाळ्या सुट्टीतही घेतल्या जाणाऱ्या परिक्षा तसेच युवा पिढीला मोबाईल, कॉम्प्युटर व सोशल मिडीयाचे लागलेले व्यसन यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत 'मामाचा गाव' हरवत चालले असुन, जुने पारंपारिक खेळही हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसुन येत आहे. 

स्मार्टफोन येण्यापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टिची बच्चेकंपनीला प्रतिक्षा असायची. सुट्टी लागताच एकात्मिक, वैयक्तीक खेळामुळे मैदाने गच्च भरलेली असायची. या खेळामध्ये मुल विटी-दांडू, लपाछपी, बकाबकी, कबड्डी, भोवरा, गोट्या, सुर पांरब्या तर मुली दोरीवरच्या उड्या, गजगे, लगोर असे नाना प्रकारचे अनेक खेळ मैदानावर खेळले जायचे. तसेच सुट्टी लागताच मामाच्या गावाला जायाचे चिंच, कच्चा कैऱ्या खाणे, मनसोक्त बागडणे असे एकत्रित येत दिवसभर मनसोक्त धम्माल करायची असा लहान मुलांचा दिनक्रम असे. परंतु, बदलत्या काळात स्मार्ट फोनच्या जमान्यात 'मामाचे गाव पोरके झाले' व बच्चेकंपनीच्या आवाजाने गजबजलेली ग्रामीण मैदाने आता ओस पडु लागली आहेत. 

ग्रामीण भागातही प्रत्येकांच्या घरी दोन ते तीन तरी स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने बच्चेकंपनीचा मोबाईवर मंनोरजन व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक वापरत असताना ऑनलाईन गेम्स व बैठ्या मंनोरजनाकडे जास्त कल असतो. परिणामी मुलांमध्ये एकाकीपणा वाढत चालला असुन, मैदानी खेळापासुन मुले दुरावली गेली. शरीर मजबुतीसाठी व आरोग्यासाठी पुर्वी मैदानी खेळ खेळले जावेत असा पुर्वजांचा आग्रह होता. परंतु आता तसे होताना दिसत नाही. सुट्टी लागताच स्पर्धेचा काळ असे सांगुन प्रशिक्षण, शैक्षणिक तासांसाठी मुलांना गुंतवले जाते.

मुले मैदानी खेळ खेळत नसल्याने मोबाईल, टिव्ही, कॉम्प्युटर यामुळे चिडचिड, मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे दिसतात. पांरपारिक खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष झाल्याने देशी खेळाचे अस्तित्व जवळपास संपले आहे. त्यामुळे भविष्यात या खेळाचा इतिहास सांगावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लहान मुले टिव्हीवरील कार्टुन मध्ये व्यस्त - 
लहान मुले मैदानी खेळ खेळण्यापेक्षा घरी टीव्हीवरील छोटा भीम, मोठु-पतलु, नींजा हातोडी बघण्यात व्यस्त असल्याचे दिसतात. मुलांना पारंपारिक खेळाकडे वळवणे खुप गरजेचे आहे. मोबाईल, कॉम्प्युटर यामुळे मुलांची कार्यक्षमत कमी होत चालली आहे. मुलांनी पारंपरिक खेळ न खेळल्यास भविष्यात मुले मनोरुग्ण होण्याची भीती आहे. त्यामुळे पालकांनी व शिक्षकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे.
हरिदास रणदिवे, जिल्हास्तरीय गुणवंत क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त

Web Title: children are addicted to smartphones and tv