मुलांनी अनुभवली बिनभिंतीची उघडी शाळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

सोलापूर - बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू.., झाडे, वेली, पशू-पाखरे यांच्याशी गुजगोष्टी करू.. अशाच काहीशा वातावरणात सोमवारी सकाळी सिद्धेश्‍वर वनविहारात बालदिन साजरा करण्यात आला. निसर्ग भ्रमंतीच्या माध्यमातून मुलामुलींसोबत त्यांच्या पालकांनीही बिनभिंतीची उघडी शाळा अनुभवली. 

सोलापूर - बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू.., झाडे, वेली, पशू-पाखरे यांच्याशी गुजगोष्टी करू.. अशाच काहीशा वातावरणात सोमवारी सकाळी सिद्धेश्‍वर वनविहारात बालदिन साजरा करण्यात आला. निसर्ग भ्रमंतीच्या माध्यमातून मुलामुलींसोबत त्यांच्या पालकांनीही बिनभिंतीची उघडी शाळा अनुभवली. 

बालदिनाच्या निमित्ताने इको फ्रेंडली क्‍लबने होम मैदानावरील पालावर राहणाऱ्या मुलांना निसर्ग भ्रमंती घडविली. क्‍लबचे संघटक मनोज देवकर यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. पालावरच्या मुलामुलींसोबत इतरही मुले आणि त्यांचे पालक निसर्ग भ्रमंतीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी संजय भोईटे यांनी मुलांना पशुपक्ष्यांविषयी माहिती दिली. गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांनीही निसर्ग भ्रमंतीमध्ये सहभागी होऊन मुलांसोबत वेळ घालविला. 

या प्रसंगी मुलांनी निसर्गाविषयी विविध प्रश्‍न विचारत माहिती जाणून घेतली. निसर्ग भ्रमंतीनंतर मुलांना अल्पोपाहार देण्यात आला. या वेळी इको फ्रेंडली क्‍लबचे अध्यक्ष अरविंद म्हेत्रे, समन्वयक परशुराम कोकणे, सदस्य मदन पोलके, वसुंधरा शर्मा, दीप्ती इंगळे, भाऊराव भोसले, दत्ता म्हेत्रे, सरस्वती कोकणे, पद्मा चिप्पा, उमा डेगीनाळ, उमाकांत गव्हाणे, प्रा. हिंदूराव गोरे, महेश देवकर, विनायक बेनगी, सुशांत वाघचवरे, आदिती मुळे, अमित पवार, प्रवीण डोके, शुभम धम्मा, नंदिनी साळुंखे, पालावरची शाळा चालविणारे प्रसाद मोहिते, अनू तीरनगरी आदी उपस्थित होते. 

इको फ्रेंडली क्‍लबच्या माध्यमातून भविष्यात अशाप्रकारचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संघटक मनोज देवकर यांनी सांगितले. मुलांसाठी निसर्ग भ्रमंतीचा उपक्रम आयोजित करण्यासाठी 9623538999 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: children experience the open walls school