मुलांची आज पायाभूत चाचणी होणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सातारा - घोकमपट्टीचे शिक्षण थांबून, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते का, त्याचे आकलन नेमके होते का, ते ज्ञान व्यावहारिक बाबींमध्ये वापरू शकतो का, याची तपासणी आता शिक्षण विभागामार्फत केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमांतील इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची उद्या (ता. 2) राष्ट्रीय संपादनूक चाचणीच्या धर्तीवर पायाभूत चाचणी घेतली जाणार आहेत. 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात महाराष्ट्राने देशात, तर साताऱ्याने राज्यात बाजी मारली. पायाभूत चाचणीत तिसरी, पाचवी इयत्तांचा अहवाल आशादायक असला तरी आठवीचा मात्र जिल्ह्याचा अहवाल निराशाजनक आहे. गणितात तर प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची स्थिती चिंताजनक असल्याची वस्तुस्थिती राष्ट्रीय संपादनूक चाचणीच्या (नॅशनल ऍचिव्हमेंट सर्व्हे) अहवालानंतर समोर आली. 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गणिती क्रिया व्यवस्थित जमत नसल्याचे पुढे आल्यानंतर शासनाचे डोळे उघडले. 

घोकमपट्टीतून पोपट तयार करणारी शिक्षण पद्धती बदलून आकलन, उपयोजन क्षमतेवर भर देणारी शिक्षण पद्धती राबविण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने परीक्षांचे स्वरूप बदलण्यात आले आहे. त्यामुळे अध्ययन निश्‍चितीवर सध्या भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण, व्यावसायिक विकास संस्थेमार्फत "नॅस'च्या धर्तीवर पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार शैक्षणिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, "प्राथमिक'चे उपशिक्षणाधिकारी एच. व्ही. जाधव यांनी तयारी पूर्ण केली आहे. 

दहा गुणांची चाचणी होणार 
"नॅस'ची चाचणी ठराविक विद्यार्थ्यांमार्फत घेतली जाते. जिल्हा परिषद मात्र सर्व विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेणार आहे. प्रत्येक विषयाची दहा गुणांची परीक्षा असेल. तिसरीसाठी प्रथम भाषा व गणित, चौथी ते सातवीपर्यंत भाषा, गणित, परिसर अभ्यास आणि सहावीपासून पुढे भाषा, गणित, सामाजिक शास्त्र विषयांची चाचणी होणार आहे.

Web Title: Children fundamental test today