चैनीसाठी चोरल्या अल्पवीयन मुलांनी अकरा दुचाकी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन तीन चोरट्यांचे कारनामे तालुका पोलिसांनी तपासात उघड केले आहेत. त्यांनी फिरण्यासाठी, मौज-मजा करण्यासाठी मोटरसायकल चोरल्या असुन, आत्तापर्यंत त्यांच्याकडुन सुमारे चार लाख रुपयांच्या अकरा मोटरसायकल ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातील आठ गाडीमालकांचा शोध लागला असुन, उर्वरीत तीन दुचाकी मालकांचा शोध सुरु आहे अशी माहिती तालुका पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर यांनी आज दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातुन दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यादृष्टीने रात्रगस्त सुरु असताना रेठरेच्या पोलिस पाटलांनी फोनवरुन रेठरे खुर्द परिसरातुन एक दुचाकी चोरक्यांनी चोरली असुन चोरटे रिक्षातुन आले होते अशी माहित दिली. त्यानुसार स्थानिकांच्या मदतीने पाठलाग करण्यात आला. त्यावेळी ते चोरटे संबंधित चोरलेली दुचाकी आणि रिक्षा सोडुन शेजारील ऊसाच्या शेतात पळुन गेले. चोरट्यांचा वाठार व आटके परिसरात शोध घेतल्यावरही ते सापडले नाहीत. त्यादरम्यान, रिक्षाच्या आधारे संशयीतांची माहिती मिळवली. त्यानंतर ते रेठरे बुद्रुक येथे दुचाकीवरुन ट्रीपलशीट फिरताना सापडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी रेठरे परिसरातील दुचाकी रिक्षातुन येवुन चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी रस्त्यालगत पार्क केलेली दुचाकी किंवा घराच्या समोर लावलेली दुचाकी ते चोरून नेल्याचे सांगितले. सुमारे चार लाख रुपये किंमतीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाठार, रेठरे, पाचवड फाटा, कासारशिरंबे, कोळे, साकुर्डी फाटा, मलकापुर येथुन दुचाकी चोरल्याचे तपासात पुढे आले आहे. 

चोरलेल्या दुचाकीपैकी आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन उर्वरीत चोरलेल्या तीन दुचाकी मालकांचा शोध सुरु आहे. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरीक्त पोलिस अधिक्षक विजय पवार यांच्या सुचनेनुसार पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, तालुका पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, बाळाराम शिंदे, हवालदार धनंजय कोळी, विकास सोनवणे, शशिकांत काळे, अमित पवार, विजय म्हेत्रे, शशिकांत घाडगे, विक्रम वळवी यांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. माळी तपास करत आहेत. 

Web Title: children stolen for the sake of luxury eleven bicycles