ऊसतोड कामगारांच्या मुलांची वणवण

ऊसतोड कामगारांच्या मुलांची वणवण

सोलापूर - ऊसतोड कामगारांसोबत आलेल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी साखर कारखान्यांवर टाकण्यात आली आहे. त्यानुसार कारखाना प्रशासनास ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शाळेत घालणे, त्यांच्या रात्रीच्या निवासाची व जेवणाची सोयही त्यांच्यावरच सोपविली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कारखान्यांना आदेश काढावेत, असे निर्देशही सरकारने दिले. परंतु, गाळप हंगाम सुरू होऊन आता महिना होऊनही त्या मुलांची वणवण सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

 गाळप हंगामाच्या निमित्ताने बार्शी, बीड, अहमदनगर या भागांतून कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात ऊसतोड कामगार चार-पाच महिन्यांसाठी येतात. कामगारांच्या काही टोळ्या कारखाना कार्यस्थळावर, तर उर्वरित टोळ्या उसाच्या फडातच राहतात. त्यांच्या मुलांसाठी सरकारने महात्मा फुले योजनेंतर्गत हंगामी साखरशाळा, हंगामी निवासी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतले. मात्र, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने सरकारने आता नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार कामगारांच्या टोळ्यांबरोबर येणाऱ्या मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी नजीकच्या शाळांवर टाकली आहे. मात्र, त्यानुसार कार्यवाहीच झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रवेश देण्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी स्वत:हून त्या मुलांसाठी काही ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यानुसार सूचना देण्यात येतील. 
- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com