बालगोपालाच्या दिंडीत श्रीगोंदेकर भक्तीरसात चिंब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

दोन दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी विठुरायाच्या जयघोषात दिंडी काढत प्लास्टिक मुक्तीचा संदेश भारुडातून देत लोकांची मने जिंकली.

श्रीगोंदे (नगर) : दोन दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी विठुरायाच्या जयघोषात दिंडी काढत प्लास्टिक मुक्तीचा संदेश भारुडातून देत लोकांची मने जिंकली. चिमुकल्यांची दिंडीत पांडुरंगाचा जयघोष करतानाच समाजप्रबोधन करुन वेगळा पायंडा स्कूल प्रशासनाने पाडला. 

विद्यार्थ्यांनी संत शेख मंहमद महाराज मंदीराच्या आवारात भारुड सादर करीत  प्लास्टिकला कायमचे बाय-बाय करा हा संदेश दिला. 
यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, संचालक अॅड. सुनील भोस, तहसीलदार महेंद्र माळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, उपनगराध्यक्ष अर्चना गोरे, राजू गोरे, असिफ इनामदार, संस्थेचे सचिव सुरेश गोलांडे, प्राचार्या नीतू दुलानी आदी उपस्थितीत होते.

Web Title: Childrens Dindi Enjoys Shrigondekars