मुलांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

राजकुमार शहा
शुक्रवार, 15 जून 2018

मोहोळ - दीड महिन्याच्या प्रदिर्ध विश्रांतीनंतर मुलांच्या किलबिलाटाने पापरी ता मोहोळ आणि तालुक्याच्या विविध भागातील शाळा पुन्हा गजबजल्या. पहिल्या दिवसाची सुरुवात फूगे घेवून मिठाई खावून झाली, कांही नवोदितांच्या  चेहऱ्यावर हसू तर काहीच्या चेहऱ्या वर आसु दिसुन आले 

मोहोळ - दीड महिन्याच्या प्रदिर्ध विश्रांतीनंतर मुलांच्या किलबिलाटाने पापरी ता मोहोळ आणि तालुक्याच्या विविध भागातील शाळा पुन्हा गजबजल्या. पहिल्या दिवसाची सुरुवात फूगे घेवून मिठाई खावून झाली, कांही नवोदितांच्या  चेहऱ्यावर हसू तर काहीच्या चेहऱ्या वर आसु दिसुन आले 

आज दि 15 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदित  मुलांचे पापरी येथील  आदर्श डिजिटल शाळेत फूगे,गुलाब पुष्प, नविन पुस्तके,गोड मिठाई देवून, रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. प्रारंभी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेतील जूने विद्यार्थी नवीन प्रवेश घेतलेल्या नवोदित विध्यार्थ्या बरोबर संवाद साधत त्यांची शाळेविषयीची भीती कमी करण्याचा प्रयत्न करीत  होते,काही नवोदित  मुलांच्या चेहऱ्यावर आसु तर काही मुलांच्या चेहऱ्यावर नवीन पुस्तके,गोड खाऊ,नवीन मित्र  मिळाल्याने हसु आलेले दिसत होते. तर अनेक चिमुकली नवीन पुस्तके हाताळण्यात मग्न होती.
 
शाळेत आज पहिल्याच दिवशी इयता पाहिली ते सातवीच्या सर्व 640 विध्यार्थ्याना पुस्तके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान भोसले,उपाध्यक्ष रमेश टेकळे,उपसरपंच अजित भोसले,माजी सैनिक चंद्रकांत लोंढे,ग्राम सेवक दीपक शेळके,सज्जन टेकळे,पिंटू गायकवाड़,बंडू भोसले,दादा गायकवाड़ उपस्थित होते.

कै सुरेश अप्पा भोसले प्रशालेतील ही नवोदित  विद्यार्थ्यांचे स्वागत  मिठाई, पाठ्य पुस्तके, गुलाब पुष्प देवून करण्यात आले यावेळी गणेश चौधरी, युवराज भोसले, रावसाहेब भाकरे, बाबुराव भोसले, उपसरपंच अजित भोसले, चंद्रकांत लोंढे आदि उपस्थित होते.

खंडाळी ता मोहोळ येथील इंगोले वस्ती  डिजिटल शाळेतही नवोदितांचे स्वागत लाडू, पुस्तके फूगे देवून करण्यात आले. यावेळी माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, मान्यवर ग्रामस्थ आदि उपस्थित होते.अर्जुन सोंड येथील नवोदित चिमुकल्यांचे स्वागत टेम्पोतुन मिरवणुक काढुन करण्यात आले यावेळी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते

Web Title: Children's school first day