कोयता घेऊन तरुणीच्या घरात सिनेस्टाईलने दहशत

कोयता घेऊन तरुणीच्या घरात सिनेस्टाईलने दहशत

कोल्हापूर - प्रेमास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीच्या घरात सिनेस्टाईलने दहशत माजवली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संबधित तरुणाला अटक केली. प्रणव दीपक पाटील (वय २३, रा. जिव्हाळा कॉलनी) असे त्या संशयिताचे नाव आहे. काल (ता. १९) रात्री मंगळवार पेठ परिसरात हा प्रकार घडला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मंगळवार पेठ परिसरातील एका तरुणीबरोबर संशयित प्रणवची ओळख होती. यातून त्यांची मैत्री वाढली. 

काही दिवसांपासून त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. याचा त्याला राग होता. याच रागातून काल रात्री नऊच्या सुमारास प्रणव हातात कोयता घेऊन संबंधित तरुणीच्या घरात घुसला. त्याने आतून कडी लावली. त्याला पाहून घरच्यांनी ओरडा केला. त्याने संबंधित तरुणीला कोयत्याचा धाक दाखवत ‘तू माझ्या प्रेमास नकार का देतेस’ असा जाब विचारला. त्याने संबंधित तरुणीसह त्यांच्या घरच्यांना धमकावले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या प्रकारामुळे तरुणी व तिचे कुटुंबीय भयभीत झाले होते. त्यांनी आज सकाळी थेट जुना राजवाडा पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिस निरीक्षक मानसिंह खोचे यांना दिली. त्यानंतर याबाबतची फिर्याद संबंधित तरुणीने पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार तरुणावर गुन्हा दाखल झाला. या घटनेचे गांभीर्य ओळखत संबंधित तरुणाला ताब्यात घेण्याच्या सूचना श्री. खोचे यांनी गुन्हे शोध पथकाला दिल्या. 

त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी आज दुपारी संशयित प्रवणला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिस प्रशासनाकडून निर्भया पथकासह विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही असे प्रकार घडत असल्याबाबत पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com