युध्दापेक्षा लोक गुन्हेगारी अन् अपघातात मरतात : तांबडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

सोलापूर : आपल्या देशात जेवढे लोक युद्धात मृत्युमुखी पडत नाहीत. त्यापेक्षाही सर्वाधिक लोक अंहकारातून वाढलेल्या गुन्हेगारी व व्यसनाधिनतेमुळे वाढलेल्या अपघातांमुळे मृत्यूमुखी पडत आहेत. ते देशाला भूषणावह नाही, असे प्रतिपादन सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले.

सोलापूर : आपल्या देशात जेवढे लोक युद्धात मृत्युमुखी पडत नाहीत. त्यापेक्षाही सर्वाधिक लोक अंहकारातून वाढलेल्या गुन्हेगारी व व्यसनाधिनतेमुळे वाढलेल्या अपघातांमुळे मृत्यूमुखी पडत आहेत. ते देशाला भूषणावह नाही, असे प्रतिपादन सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले.

वाहतूक अपघात रोखण्याच्या उद्देशाने 'सकाळ' व शहर वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने मंगळवारी, सिंहगड शैक्षणिक संस्थेत मुलांमध्ये जागृती व्हावी, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 'सकाळ' चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, सिंहगडचे प्राचार्य शंकर नवले, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कायद्याने माणूस शहाणा होत नाही तर ते प्रबोधन व सुधारणा होण्यासाठी आहेत. प्रत्येकांमध्ये स्वंयशिस्त महत्वाची आहे. प्रत्येक गोष्टीतून चांगली बाब घ्यावी. कायदे बदलण्यापेक्षा ते राबविण्याचे स्वातंत्र्य हवे. कायद्याचे पालन होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. शक्यतो रात्री -अपरात्री प्रवास करू नये. 

शिंदे म्हणाल्या, प्रत्येक चालकांनी वाहन चालविताना आपल्या कुटुंबाचा विचार करावा. अपघाताचे नियम पाळा आणि अपघात टाळा. प्रत्येक शाळा, महाविदयालयांनी वाहतूक नियमांबाबत जागृतीचे कार्यक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. दंड चुकविण्यासाठी जीव धोक्यात घालू नका. वाहनचालकाचे प्रमुख काम आहे की, स्वतः बरोबरच इतरांची सुरक्षितता जोपासणे. सेल्फी चा मोह आवरा. अफवांना बळी पडू नका. अपघातग्रस्तांना सर्वांनी मदत करावी, कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर तब्बल ४० वर्षे वाहतूकीबाबतचा ब्रिटिशाचा कायदा होता. मात्र, वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. देशात वर्षाला पाच लाख अपघातात सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतोय. त्यामुळे १९८८ मध्ये भारतात वाहन चालविण्याचे नियम ठरले आणि स्वतंत्र कायदा अस्तित्वात आला, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहरात मागील वर्षभरात ५० हजारांहून अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया केल्या. मात्र, स्थिती 'जैसे थे' असल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकी व उत्तरदायित्व जोपासण्यासाठी सिंहगड कॅम्पस् मधील शिक्षक व कर्मचारी यांच्यासह विद्यार्थांना हेल्मेट बंधनकारक करण्यात येणार आहे.
- संजय नवले, प्राचार्य, सिंहगड कॅम्पस

नियम तोडण्याची स्पर्धा करण्यापेक्षा नियम पाळण्याची गरज आहे. पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधावा. स्मार्ट सिटी होण्यासाठी दिसण्यापेक्षा विचाराने स्मार्ट व्हावे.
- अभय दिवाणजी, सहयोगी संपादक, सकाळ

Web Title: citizens died crime and accident then war said tambade