जे. जे. फार्मस् कंपनीवर दरोड्याचा सखोल तपास व्हावा, कोरेगोवाकरांची मागणी

राजेंद्र वाघ
शनिवार, 23 जून 2018

कोरेगाव (सातारा) : किन्हई (ता. कोरेगाव) येथील जे. जे. फार्मस् या कंपनीवर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये दरोड्याचे कलम लावले नाही, या प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत नाही, असा आक्षेप पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या ग्रामस्थांनी घेतला. सात महिन्यांपूर्वीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी किन्हई ग्रामस्थांनी काल (शुक्रवारी) कोरेगाव पोलिसांकडे धाव घेतली. 

यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र भोसले, निवृत्ती होळ, सुनिल भोसले, उमेश भोसले आदींनी पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की किन्हई येथे जे. जे. फार्मस व न्युट्रीक्स गोल्ड अॅग्रो या नावाने जे. डी. जाधव, जीवन जाधव, उज्वला चव्हाण यांनी उद्योग सुरु केला होता. न्युट्रीक्स गोल्डमध्ये पुणे येथील भालचंद्र पोळ व जीवन जाधव यांची प्रत्येकी ४९ टक्के व समीर फापळे यांची दोन टक्के भागीदारी होती. दरम्यान, आर्थिक बाबींच्या मतभेदामुळे भागीदार पोळ, फापळे, निलेश बोबडे, राजेंद्र जाधव, हेमंत साबळे, किरण आठल्ये, सचिन घोलप यांनी नियोजनबद्धपणे अचानक कंपनी बंद केली. त्यानंतर कोणताही ठराव मंजूर झालेला नसताना बेकायदेशीरपणे गुंडांना आणून कंपनीची मशीनरी उचलून नेली. यावेळी घरातील लोकांना अमानुषपणे मारहाण करत त्यांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना घरात कोंडून ठेवले. हे कृत्य म्हणजे मोठा दरोडा आहे. याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीत दरोड्याचे कलम लावले नाही. अद्याप पंचनामा झाला नाही.

सात महिन्यांनंतरही ग्रामस्थांपैकी कोणाचा जबाब घेतला नाही. या प्रकरणात सहभागी असलेल्या वरील सात जणांवरील गुन्हे दाबून टाकण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात जे. डी. जाधव व जीवन जाधव यांनी अनेक अर्ज व स्मरणपत्रे देऊन तसेच पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक व पोलिस निरीक्षकांना भेटून गुन्ह्याच्या योग्य चौकशीची व कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून निःपक्ष तपास करावा व पोळ व त्याच्या सहा साथीदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे. याप्रकरणी माहिती घेऊन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन श्री. चुडाप्पा यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

Web Title: citizens of koregao demand to find criminal who looted j j farms company