#SataraFlood साथी हात बढाना...सातारकर सरसावले पूरग्रस्तांसाठी

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध संस्थांबरोबरच अध्यात्मिक संप्रदाय पूढे आले आहेत. तुम्हांला ही वैयक्तिक रित्या मदत करण्यासाठी त्यांनी संपर्क क्रमांक खूले केले आहेत. त्यावर संपर्क साधून तुम्ही ही करु शकता मदतीचा हात पुढे. 

सातारा ः आपत्ती कोणतीही असो राष्ट्रीय अथवा नैसर्गिक सातारकर नेहमीच आपल्या छातीचा कोट करुन मदतीसाठी पूढे असतात. त्याचा प्रत्यय गेल्या चार दिवसांपासून धो-धो वाहणाऱ्या पावसांत निवारा दमवाणाऱ्या कुटुंबांना, पूूरात अडकलेल्यांना, राष्ट्रीय महामार्गावर तासनतास थांबलेल्यांना येऊ लागला आहे. सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांपासून अगदी नवखे व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून हजारे हात मदतीसाठी सरसावू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे हजारो लोकांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे. सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील अवजड वाहतुक थांबविण्यात आली आहे.
यामुळे शेकडो वाहने महामार्गावर थबकली आहेत. यामुळे गरजवंताच्या चहा, नाष्टा यासह भोजन व्यवस्थेसाठी सातारकर मदत गोळू करु लागले आहेत. तसेच काहींनी मदतीचा "श्री गणेशा' ही केला आहे. प्रत्येक जण आपआपल्यापरीने मदत करु इच्छित आहे. परंतु जमा केलेली अन्नपदार्थांची मदत काही वेळेला जादा होत आहे. लोकांच्या मदतीसाठी आता पोलिस प्रशासनाने ही प्रयत्न सुरु केले आहेत.
अन्न पदार्थांची मदतीचे नियोजन योग्य पद्धतीने झाल्यास ते वाया जाणार नाही. यासाठी ज्यांना मदत करावयाची आहे त्यांनी पोलिस उपअधीक्षक समीर शेख (9718193546) यांच्याशी संपर्क साधावा.
दरम्यान पाटण तालुक्‍यातील पूरग्रस्तांना औषधे, ब्लॅंकेट, अंथरूण, लहान मुलांचे कपडे, स्वेटर या वस्तुंची मदत देण्यासाठी नागरीक पूढे येऊ लागले आहेत. ज्यांना मदत द्यावयाची आहे त्यांनी येथे संपर्क साधावा.
आर्ट ऑफ लिव्हिंग
सुधीर घार्गे (9975137771)
अविनाश पवार (9284555145)
जिल्हा वाहतुकदार संघटना
प्रकाश गवळी (9422039039)
अविनाश कदम (9422400615)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of satara are helping in flood affected area