Lockdown : शर्थीच्या प्रयत्नांनंतर कोल्ह्याची विहिरीतून सुटका

Lockdown : शर्थीच्या प्रयत्नांनंतर कोल्ह्याची विहिरीतून सुटका

दहिवडी : 'कोरोना'च्या भितीने सर्वांनाच घरातंच राहावं लागत आहे. मात्र जंगली श्वापदांवर कोणाचं अन कसलं आलंय बंधन. त्यामुळेच अन्नाच्या शोधार्थ भटकणारा कोल्हा अचानक विहीरीत पडला. मात्र स्थानिक तरुण व वन विभाग दहिवडीच्या प्रयत्नाने कोल्ह्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

'कोरोना'च्या भितीने सर्वजण घरातच थांबून आहेत. त्यातच मलवडी ग्रामपंचायतीने गुरुवारपासून सलग तीन दिवस गाव शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र सामसूम होती. दुपारी साधारण चारच्या सुमारास येथील कुंभारकी परिसरातील कैलास दळवी यांच्या विहिरीत कोल्हा पडला असल्याचे तेथील मुलांना लक्षात आले. त्यांनी ही बाब मोठ्या लोकांच्या कानावर घातली. सत्रेवाडीचे सरपंच अनिल हराळे यांनी याची माहिती वन विभाग दहिवडी यांना दिली. वनक्षेत्रपाल एम. पी. मुळे यांनी वन अधिकारी आर. आर. जगताप तसेच वन मजूर एल. आर. काकडे व आप्पा जाधव यांना कोल्ह्याची सुटका करण्यासाठी पाठवले.

वन अधिकारी जगताप व त्यांचे सहकारी घटनास्थळी आल्यावर त्यांनी अंदाज घेवून दोर बांधून टोमॅटोसाठी वापरण्यात येणार्या कॅरेटच्या सहाय्याने कोल्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. त्यानंतर वनमजूराच्या सोबतीने येथील किरण कुंभार विहिरीत उतरला. तर प्रशांत जाधव याने थेट विहिरीत उडी घेवून कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला. वारंवार प्रयत्न केल्यानंतर प्रशांतने कोल्ह्याच्या पायाला दोरी बांधण्यात यश मिळवले. नंतर कोल्ह्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. विहिरीच्या बाहेर काढल्यानंतर पायाची दोरी सोडल्यानंतर कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व काही क्षणातच तो दिसेनासा झाला.

Lockdown : जुगारप्रकरणी 44 जणांना अटक

शिरवळची अंबिकामाता यात्रा रद्द 

खंडाळा : शिरवळ येथील अंबिकामाताची शिरवळ ते तुळजापूर जाणारी सासनकाठी व अक्षयतृतीयाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, सरपंच लक्ष्मीताई पानसरे, उपसरपंच सुनील देशमुख, देवीचे पुजारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुखांच्या उपस्थितीत बैठकीत झाल्याची माहिती देवीचे मानकरी शिवाजीराव देशमुख- पाटील यांनी दिली.
 
श्री अंबिकामातेची शिरवळ ते तुळजापूर सासनकाठी सोहळा रामनवमीपासून मंदिरातून प्रस्थान होत असते. यात्रा 26 व 27 एप्रिल रोजी भरणार होती; परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सासनकाठी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com