सोलापूरकरांनी जाणून घेतला डॉ. कोटणीसांचा इतिहास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

सोलापूर : डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृतिदिनानिमित्त इंटॅक सोलापूर विभागाने रविवारी डॉ. कोटणीस स्मारक येथे वारसा फेरी आयोजित केली होती. उपस्थित सोलापूरकरांनी अभ्यासकांकडून डॉ. कोटणीस यांच्याबद्दल जाणून घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. 

इंटॅक संस्थेच्या समन्वयक सीमंतिनी चाफळकर यांनी स्वागत करून डॉ. कोटणीस यांचे घर आणि त्याचे स्मारकात रूपांतर याबद्दल थोडक्‍यात माहिती दिली. अभ्यासक डॉ. सत्यव्रत नूलकर यांनी डॉ. कोटणीस यांच्या मानवतावादी कार्याचा व चरित्राचा आढावा घेतला. डॉ. कोटणीस यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर स्मारक परिसराची पाहणी करण्यात आली. अनेकजण प्रथमच स्मारक पाहत होते. अधिक माहिती जाणून घेत अनेकांनी आनंद व्यक्त केला.

इतर मित्रमंडळींना घेऊन पुन्हा येण्याचा निश्‍चय अनेकांनी या वेळी केला. 
या फेरीत जयश्री कोगनूर, नागेश धरणे, प्रीती श्रीराम, विजय जोशी, मोहसीन शेख, अपर्णा पाटील, मंदा माशाळकर, श्रुती जोशी, दीप्ती मंगरूळे, चेतन लिगाडे, आनंद भुरळे, होनकळस, पांडुरंग मग्रुमखाने, पुरुषोत्तम वग्गा, संतोष हंपे, गणेश लेंगरे, राहुल बिराजदार, अनिता ढोबळे, प्रा. नरेंद्र काटीकर, ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांच्यासह विद्यार्थी व वारसाप्रेमी सहभागी झाले होते. इंटॅक सदस्य व सह समन्वयक नितीन अणवेकर, श्‍वेता कोठावळे, पुष्पांजली काटीकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

Web Title: citizens of solapur learned Dr. Kotnis History