शहर पोलिस उपअधीक्षकपदी डॉ. प्रशांत अमृतकर रुजू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

कोल्हापूर - शहर पोलिस उपअधीक्षकपदाचा पदभार आज डॉ. प्रशांत श्रीराम अमृतकर यांनी स्वीकारला. भारतकुमार राणे यांची नुकतीच बदली झाल्याने हे पद रिक्त होते.

कोल्हापूर - शहर पोलिस उपअधीक्षकपदाचा पदभार आज डॉ. प्रशांत श्रीराम अमृतकर यांनी स्वीकारला. भारतकुमार राणे यांची नुकतीच बदली झाल्याने हे पद रिक्त होते.

डॉ. अमृतकर मूळचे सटाणा येथील आहेत. त्यांचे वडील हायस्कूलमधून निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी बीएचएमएस ही वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर ते तीन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. स्पर्धा परीक्षेतून ते २०१३ मध्ये पोलिस दलात रुजू झाले. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांनी सोलापूर ग्रामीण येथे काम केले. त्यानंतर अधिकारी म्हणून त्यांच्याकडे सोलापूर शहर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविली होती. सध्या ते बार्शी येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सोलापूर दर्गा प्रकरणाच्या तपासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Web Title: City Police Deputy Superintendent of Police Prashant Amritkar