नगरचे "आयुष' रखडले!

The city's "Ayush" work stalled!
The city's "Ayush" work stalled!

नगर, ः राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमात प्रत्येकी 30 खाटांची चार "आयुष रुग्णालये' राज्यात मंजूर झाली आहेत. त्यातील तीन रुग्णालयांची कामे सुरूही झाली असून, नगरमधील कामच अद्याप सुरू झालेले नाही. या कामात अनेक अडथळे येत असल्याने हे काम कधी सुरू होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

राज्यात पुणे, नंदुरबार, नगर आणि सिंधुदुर्ग येथे आयुष रुग्णालय बांधण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या प्रत्येकी आठ कोटी 99 लाख 51 हजार 793 रुपये बांधकामाच्या खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. प्रत्येकासाठी 2017-18 मध्ये एक कोटी रुपयांचा निधी वर्गही करण्यात आलेला आहे. या रुग्णालयांच्या कामाची निविदा प्रक्रिया राबवून त्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यात पुणे, नंदुरबार, सिंधुदुर्ग येथील रुग्णालयांच्या कामास सुरवात झाली असून, अद्याप नगर येथील कामास सुरवात झालेली नाही. या कामात काही अडथळे येत असले, तरी ते प्रशासनाकडून दूर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हे रुग्णालय कधी उभे राहणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या कामासाठी ठेकेदाराने सुमारे एक कोटी रुपयांची अनामत रक्कम भरलेली आहे. कामास विलंब होत असल्यामुळे सध्या तरी संबंधित ठेकेदाराच्या अडचणीत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. आयुष रुग्णालयाचे काम वेगाने सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. 

रुग्णालयांची गरज 

2008 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी व योगा असे तीन विभाग "आयुष'च्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी निधी पुरविला जात आहे. मात्र, 2016मध्ये या अभियानाचे नामकरण राष्ट्रीय आरोग्य अभियान असे झाले. 2008मध्ये आयुष विभाग राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत सुरू झाला. हा विभाग सुरू झाल्यानंतर रुग्णांकडून सुरवातीच्या वर्षात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा रुग्णालयांची आवश्‍यकता आहे. 

काम लवकरच सुरू होणार 
आयुष रुग्णालयाच्या कामात काही अडचणी आल्या होत्या. त्या दूर झाल्या असून, काम लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील इतर रुग्णालयांच्या बरोबरीनेच हे काम पूर्ण होईल. 
- प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com