" या ' शहराच्या महापौर निवडीला अखेर मिळाला मुहुर्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

सोलापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण 102) 
भाजप (49), शिवसेना (21), कॉंग्रेस (14), एमआयएम (08), राष्ट्रवादी कॉंग्रेस (चार), वंचित बहुजन आघाडी (तीन), बहुजन समाज पक्ष (एक), माकप (एक). 
एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने एकूण नगरसेवकांची संख्या 101 झाली असून, एमआयएमचे बलाबलही एकने कमी होऊन आठ झाले आहे. 

 
सोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महापौर निवडीला अखेर मुहुर्त मिळाला असून, चार डिसेंबर रोजी निवड होणार आहे. त्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी अर्ज स्वीकारण्यात दाखल करता येतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. 

हेही वाचा... पंढरपूर :थंडीमुळे विठुरायाच्या अंगावर शाल व रजई

सलग चौथ्यांचा महिलासाठी आरक्षित 
यंदा सलग चौथ्यांदा महापौरपद हे महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा महिलाराज येणार आहे. बुधवारी मुंबईत काढण्यात आलेल्या सोडतीत इतर मागासवर्गीय महिलांसाठी महापौरपद राखीव झाले. त्यामुळे नगरसेवकांना तब्बल 10 वर्षे या पदापासून वंचित राहावे लागले आहे. यापूर्वी अलका राठोड, प्रा. सुशीला आबुटे, विद्यमान शोभा बनशेट्टी महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. आताही महिलाच महापौरपदी विराजमान होईल. या पदासाठी श्रीकांचना यन्नम, अंबिका पाटील आणि राजश्री कणके यांची नावे आघाडीवर आहेत. 

हेही पहा..सोलापूरचे वाॅल हॅंगिंग झळकणार ` व्हाईट हाऊसमध्ये `

इच्छुकांची संख्या मोठी 
यन्नम यांच्याशिवाय उपमहापौर शशिकला बत्तुल, राजश्री कणके, कल्पना कारभारी, राधिका पोसा, प्रतिभा मुदगल, अनिता कोंडी, मेनका राठोड, अश्‍विनी चव्हाण, मनीषा हुच्चे या नगरसेविका या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नेते कोणाला प्राधान्य देतात त्यावर महापौरपदाचा उमेदवार निश्‍चित होईल. सध्याच्या टर्ममध्ये सौ. यन्नम यांचा सव्वा वर्षांसाठी दावा होता. मात्र, तो प्रत्यक्षात आला नाही. आता दावेदार वाढले आहेत. त्यामुळे महापौर निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत आहेत. 

हेही वाचा... मोतीराम वाघ...पर्यावरण रक्षणासाठी झटणारा अकलूजचा अवलिया

विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष 
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस-मित्र पक्ष आघाडीची सत्ता आली तर महापालिकेत त्याचे पडसाद उमटू शकतात. भाजपला महापौरपदापासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधक आल्यास शिवसेनेसह कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसप, माकप व राष्ट्रवादी कॉंग्रेसची संख्या भाजपच्या तुलनेत जास्त होते. उमेदवारीवरून भाजपमध्ये बंडखोरी झाल्यास त्याचा फायदा विरोधक उठवू शकतात. प्रतीक्षा आहे ती राज्यात कोणाची सत्ता स्थापन होते, त्याची. त्यानंतर महापालिकेतही फेरबदल होऊ शकतात. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The city's mayor's finally decleared , on 4th decembar fruition