‘रक्तविघटन’लाल फितीत!

Civil-Hospital
Civil-Hospital

सातारा - जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्‍यक भासणारी रक्तघटक स्वतंत्र करण्याची यंत्रणा गेल्या साडेचार वर्षांपासून लाल फितीच्या कारभारात अडकली आहे. आधी इमारती व आता यंत्रणेअभावी काम रेंगाळल्याने सामान्य नागरिकांना खासगी पेढ्यांमधून रक्तघटक घेण्याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

रक्तामध्ये लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट असे घटक असतात. वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी संशोधनामुळे रक्तातील हे घटक स्वतंत्र करता येणे शक्‍य झाले आहे. रक्तविघटन प्रक्रियेद्वारे लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट हे तीन घटक वेगवेगळे करून रुग्णाला त्याच्या आवश्‍यकतेनुसार देणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे आवश्‍यकता नसतानाही संपूर्ण रक्त रुग्णाला द्यावे लागत नाही.

रक्तक्षय, किडनी व हृदयविकार, तसेच थॅलेस्मियाच्या रुग्णांना रक्तवाढीसाठी लाल रक्तपेशींची गरज असते. भाजून जखमी झालेल्या, तसेच जलोदराचा आजार असलेल्यांना रक्तातील ‘प्लाझ्मा’ या घटकाची गरज असते, तर डेंगी व कर्करोगाच्या रुग्णांना ‘प्लेटलेट’ आवश्‍यक असतात. त्यांना संपूर्ण रक्त देण्याची गरज नसते. आवश्‍यक तो घटक दिल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा होते. मात्र, ही सुविधा खासगी रक्तपेढींमध्येच उपलब्ध आहे. प्रकियेसाठी लागणारे यंत्र व इतर खर्चामुळे रक्तघटकांचा दर संपूर्ण रक्तापेक्षा जास्त असतो. त्यामुळे अनेक रुग्णांना ते घेता येत नाही, तर, अनेकांना नाईलाजास्त खर्च सोसावा लागतो. तसेच थॅलेस्मियाच्या रुग्णांनाही बाहेरील रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.रुग्णांची ही अडचण ओळखून शासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये रक्त विघटनाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय सुमारे चार वर्षांपूर्वी घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com