esakal | सिव्हिलला पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष 

बोलून बातमी शोधा

Civil neglects the poor condition of alternative roads

स्वच्छ सर्वेक्षणचा नारा देणाऱ्या महापालिकेने शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ दर्शनी बाजू चकाचक, रंगारंग करून अंतर्गत रस्ते, स्वच्छतेकडे कानाडोळा केल्याचा प्रकार होत आहे.

सिव्हिलला पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष 
sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : स्वच्छ सर्वेक्षणचा नारा देणाऱ्या महापालिकेने शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ दर्शनी बाजू चकाचक, रंगारंग करून अंतर्गत रस्ते, स्वच्छतेकडे कानाडोळा केल्याचा प्रकार होत आहे. मोठा गाजावाजा करत राम मंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल मार्गावरील ट्रिमिक्‍स रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र त्याला पर्यायी ठरणाऱ्या रस्त्यांची मात्र वाट लागल्याचे चित्र आहे. 

स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली शहरात अनेक ठिकाणी रंगरंगोटी, रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे शहराचे बदलणारे स्वरुप सुखावणारे असले तरी दुसऱ्या बाजूला भोंगळ कारभाराकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था शहराचे बकालपण दर्शवते. 

सिव्हिल चौकानजीक सम्राट व्यायाम मंडळाच्या कमानीपासून धनगर गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावरचे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. सिव्हिल रोडवर रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने पर्यायी रस्त्यांवर वाहतूक वाढली आहे. राम मंदिर चौकातून धनगर गल्लीमार्गे सिव्हिल हॉस्पिटलकडे जावे लागते. मात्र या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य असल्याने अपघात घडत आहेत. रस्त्यावर सुमारे अर्धाडझन लहानमोठे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. 

बाहेरगावातून येणाऱ्यांना एखाद्या खेड्यातील रस्त्यावरून चालल्याचा भास या रस्त्यावर होत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही हालचाल करण्याची गरज आहे. खड्डयातून गाड्या चालवताना वाहनधारकांची तारांबळ होत आहे. 
- झाकीर जमादार, सामाजिक कार्यकर्ते, खणभाग, सांगली. 

संपादन : प्रफुल्ल सुतार