प्रेमविवाहाच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी

प्रेमविवाहाच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी

कोल्हापूर - मुलांनी प्रेमविवाह केल्याच्या वादातून आज दुपारी शिवाजी चौकात दोन कुटुंबात चांगलीच जुंपली. दोन्ही कुटुंबे एकमेकांवर धावून गेल्याने हाणामारी झाली. त्याने पळापळही झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शहर वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत भांडण सोडवून सर्वांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणले. घडलेल्या प्रकाराबाबतची नोंद करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती, सराफ व्यवसायाशी निगडित दोन कुटुंबातील तरुण- तरुणीने नोंदणीकृत पद्धतीने आज विवाह केला. या विवाहाला मुलीकडील लोकांचा विरोध होता. ते दोघे शिवाजी मार्केटमधील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणीसाठी जाणार होते. याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना समजताच ते दोघांची वाट बघत तेथे थांबले. दरम्यान, संबंधित तरुण तरुणीसह प्रतिज्ञापत्र करण्यास दुपारी एकच्या दरम्यान आला. तेथे मुलीकडील मंडळींनी दोघांवर चाल केली.

मुलाकडील नातेवाईकांनीही प्रतिउत्तर दिले. त्यामुळे गोंधळ उडून तणाव निर्माण झाला. नेमके काय झालंय, कोण कोणाला मारतोय हे रस्त्यावरील नागरिकांच्या व वाहनधारकांच्यात लक्षात आले नाही. त्यामुळे तणावात भर पडली. दरम्यान, या रस्त्यावर कर्तव्य बजावत असलेल्या शहर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थीने भांडण सोडवले. त्यानंतर संबंधित तरुण-तरुणीसह नातेवाईकांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणले. येथे दोन्ही कुटुंबाच्या तक्रारी जाणून घेऊन त्यानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com