भांडणाचा राग मनात धरून कापूसखेडमध्ये तरूणाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन कापूसखेड (ता. वाळवा, जि. सांगली) येथे मरळे व मोकाशी या दोन कुटुंबात झालेल्या तुंबळ मारामारीत विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अश्‍विनी मरळे यांचे पती सागर शिवाजी मरळे (वय 35) यांचा खून झाला. तर यात चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

इस्लामपूर : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन कापूसखेड (ता. वाळवा, जि. सांगली) येथे मरळे व मोकाशी या दोन कुटुंबात झालेल्या तुंबळ मारामारीत विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अश्‍विनी मरळे यांचे पती सागर शिवाजी मरळे (वय 35) यांचा खून झाला. तर यात चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या भांडणावेळी झालेल्या दगडफेकीत मोकाशी कुुटुंबीयांच्या एक चारचाकी व एका दुचाकीची तोडफोड करण्याबरोबरच त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. जखमींवर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या घटनेमुळे कापूसखेड गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत दोन्ही कुटुंबीयांकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत. खूनप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी अजित व नितीन दिलीप मोकाशी या दोघा बंधूंना अटक केली आहे.  दिलीप भीमराव मोकाशी, त्यांची पत्नी उज्वला मोकाशी, नितीन मोकाशी, शिवाजी विठ्ठल मरळे (वय 64, सर्व रा. कापूसखेड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. गुरुवारी (ता.5) रात्री 11 च्या सुमारास कापूसखेड येथील दत्तनगरमध्ये ही घटना घडली. मरळे व मोकाशी कुटुंबीय दत्तनगरमधील एकाच गल्लीत राहतात. 

या दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरुन व ग्रामपंचायत निवडणुकीवरुन धुसफूस होती. या धुसफुसीतूनच काल रात्री सागर मरळे याचा खून झाला. याबाबत मृत सागरचे वडील शिवाजी मरळे व नितीन मोकाशी यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. शिवाजी मरळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Clashes Murder Crime News Kapus Khed