'ऑडिओ क्‍लिप'ने पाडले राष्ट्रवादीत दोन गट !

clashes in ncp because of audio clip in solapur
clashes in ncp because of audio clip in solapur

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या तथाकथित ऑडिओ क्‍लिपने आता जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत दोन गट पाडले आहेत.
क्‍लिपमधील आवाज साळुंखे यांचाच असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका अक्कलकोट तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. आवाज साळुंखे यांचा नसल्याचे सांगत आम्ही साळुंखेच्या यांच्या पाठीशी उभा असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांनी व महिला जिल्हाध्यक्षांनी घेतली आहे. 

तो आवाज जिल्हाध्यक्ष साळुंखे यांचाच आहे हे सांगण्यासाठी अक्कलकोट तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद आज हॉटेल ऐश्‍वर्यामध्ये झाली. तो आवाज जिल्हाध्यक्षांचा नाही हे सांगण्यासाठी कार्याध्यक्ष बळिराम साठे, कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि महिला जिल्हाध्यक्षा मंदा काळे यांची पत्रकार परिषद राष्ट्रवादी भवनात झाली. दरम्यान त्या क्‍लिपमध्ये जिल्हाध्यक्ष साळुंखे यांच्यासोबत संभाषण करणारी व्यक्ती मोतीराम चव्हाण यांचा शोध अक्कलकोट राष्ट्रवादी व जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेत आहेत. चव्हाण यांचा मोबाईल बंद आहे. चव्हाण यांचे काय झाले? असा प्रश्‍न आता चर्चेत येऊ लागला आहे. पक्षाची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना राष्ट्रवादीच्या विधी सेलला देण्यात आली आहेत. पक्षाची व जिल्हाध्यक्षांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे विधी सेल जिल्हाध्यक्ष अॅड. विकास जाधव यांनी सांगितले. 

साळुंखेचा राजीनामा घ्या अन्यथा आम्ही राजीनामे देऊ -
त्या क्‍लिपमधील आवाज हा जिल्हाध्यक्ष साळुंखे यांचा आहे. त्यांचा राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ करपे व सुरेखा पाटील यांनी केली. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, दिलीप सिध्दे, वैशाली गुंड, लता फुटाणे आदी उपस्थित होते. 

साळुंखेंच्या पाठीशी जिल्ह्याची राष्ट्रवादी खंबीरपणे उभा -
जिल्हाध्यक्ष साळुंखे यांच्यासोबत त्या क्‍लिपमध्ये बोलणारी व्यक्ती समोर येत नाही. त्यामुळे हे साळुंखे यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. जिल्हा राष्ट्रवादी साळुंखे यांच्या पाठीशी असल्याची माहिती कार्याध्यक्ष साठे, कार्याध्यक्ष पाटील व महिला अध्यक्षा काळे यांनी दिली. जिल्हाध्यक्ष साळुंखे म्हणाले, माझ्या आवाजाचे डबिंग करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. कायदेशीर सल्ला घेऊन बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com