सोलापुरातील हेरिटेज इमारतींची वर्गवारी निश्‍चित 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 14 डिसेंबर 2019

विधानसभा निवडणुकीमुळे लांबली प्रक्रिया 
महापालिका सभेने ठराव मंजूर केल्यानंतर तो अभिप्रायासाठी विधान सल्लागारांकडे पाठविण्यात आला होता. त्या संदर्भात अभिप्राय आला असून, त्यानुसार कार्यवाही करण्याच्या प्रस्तावावर आयुक्त दीपक तावरे यांनीही स्वाक्षरी केली. जाहीर प्रसिद्धीकरणानंतर 18 जुलै रोजी यादी राजपत्रात प्रसिद्ध झाली. त्यानंतर आता वैयक्तिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी अपेक्षित आहे. याची प्रक्रिया अगोदरच होणे अपेक्षित होते. मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर लागलेली राष्ट्रपती राजवट यामुळे प्रक्रिया थांबली होती. आता वैयक्तिक नोटीसा बजावण्यात आल्या असून, सुनावणी होणार आहे. 

सोलापूर ः शहरातील हेरिटेज इमारतींची वर्गवारी महापालिकेने निश्‍चित केली आहे. त्यानुसार जाहीर प्रसिद्धकरण करण्यात आले असून, संबंधित मिळकतींच्या मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर जानेवारी 2020 मध्ये सुनावणी होईल. 

हेही वाचा... माझ्या लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस 

समिती स्थापण्यास टाळाटाळ 
हेरिटेज समिती स्थापन करण्यात महापालिकेने तब्बल 18 वर्षांपासून टाळाटाळ केली. काही जुन्या इमारती पाडण्यात हेरिटेज समितीची अडचण येऊ नये म्हणून हा विषय अजेंड्यावर घेण्यास टाळाटाळ केली गेली. मात्र "सकाळ'मध्ये मालिका प्रसिद्ध झाल्यावर तत्कालीन महापौर शोभा बनशेट्टी व तत्कालीन सभागृहनेते संजय कोळी यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला आणि सभेत एकमताने मंजूरही करण्यात आला. या समितीसाठी प्रशासनाने अध्यक्षपदासाठी महापालिकेचे माजी आयुक्त तथा माजी प्रधान सचिव टी. सी. बेंजामिन, तर सदस्यपदासाठी इतिहास भारतीय पुरातत्त्व संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विनायक धुळप, आर्किटेक्‍चर अमोल चाफळकर, सीमंतिनी चाफळकर, सविता दीपाली, पुष्पांजली काटीकर, अजित हरिसंगम यांची शिफारस केली आहे. हा विषय मार्गी लागण्यासाठी सहायक नगररचना संचालक लक्ष्मण चलवादी आणि अभियंता महेश क्षीरसागर यांनीही प्रयत्न केले. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: रोपटे आणि बाहेरील
भुईकोट किल्ला सोलापूर 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: आकाश, ढग, झाड आणि बाहेरील
भागवत चित्रपटगृह परिसर 

ग्रेड एकमध्ये या वास्तूंचा आहे समावेश 
भुईकोट किल्ला सोलापूर, श्री सिद्धेश्‍वर तलाव, जनरल पोस्ट ऑफिस आणि मंगळवार पेठ पोलिस चौकी, जुनी सोलापूर महापालिका, महापालिकेमागील बंगला, डॉ. कोटणीस बंगला, लक्ष्मी मार्केट, गणपती घाट आणि होम मैदान, श्री सिद्धेश्‍वर मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, रावजी सखाराम आयुर्वेदिक रसशाळा-हॉस्पिटल, भागवत चित्रमंदिर संकुल, लक्ष्मी-विष्णू मिल चिमणी (दोन) आणि एन. जी. मिल परिसर व सीमा. 

हेही वाचा...  विकत घेतला 93900 चा आयफोन, पण....

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: झाड, आकाश, रोपटे, बाहेरील आणि निसर्ग
डाॅ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक 


श्री मल्लिकार्जुन मंदीर 

ग्रेड दोनमध्ये समाविष्ट वास्तू 
सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉक, जिल्हा न्यायालय इमारत, शासकीय तंत्रनिकेतन, कुचन हायस्कूलजवळील कामगार कल्याण केंद्र, लेडीज आयटीआय, नॉर्थकोट हायस्कूल, जिल्हाधिकारी बंगला, पोलिस आयुक्त बंगला, न्यायाधीश बंगला, सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलाव, स्मृतिवन, सिद्धेश्‍वर वनविहार, नागबावडी विहीर, रिपन हॉल, पाचकंदील, उदगिरी गल्ली परिसर व सीमा, गणपती घाट, माटे शिवमंदिर-निराळेवस्ती, हिराचंद नेमचंद वाचनालय, गोल चावडी, जुना एलआयसी बंगला, साखर पेठ विहीर, दयानंद महाविद्यालय, हरिभाई देवकरण प्रशाला, मेसॉनिक हॉल, संगमेश्‍वर महाविद्यालय, ओरोनोको शाळा, हाजीभाई दर्गा, जबितखान बाबा दर्गा, खंडोबा मंदिर बाळे, जुने विठ्ठल मंदिर, बुबणे मंदिर, आदिनाथ जैन मंदिर, हिराचंद गांधी आदिनाथ जैन मंदिर, कसबा पार्श्‍वनाथ जैन मंदिर, मार्कंडेय मंदिर, उमेदपूर चर्च, दत्त चौक चर्च, श्री रेवणसिद्धेश्‍वर मंदिर, शुभराय मठ, सोन्नलगी सिद्धेश्‍वर मंदिर, जोडभावी पेठ जैन मंदिर, शहरातील 68 लिंग व गणपती मंदिर, शाहजहूरवली दर्गा, रूपाभवानी मंदिर, हिंगुलांबिका मंदिर, इराबत्ती मारुती मंदिर, मंगळवार पेठ श्रीराम नारायण मंदिर, कसबापेठ गायखाटिक मस्जिद, जामा मस्जिद, कसबा पेठ काळी मस्जिद, पारसी अग्यारी सदर बझार, रोमन कॅथॉलिक चर्च, सेंट जोसेफ हायस्कूल, बेंबळगी विद्यालय, सरस्वती मंदिर शाळा, सेवासदन प्रशाला, राघवेंद्रस्वामी मठ, श्रद्धानंद तालीम, तुळजापूर वेस बलिदान चौक स्मारक आणि मल्लिकार्जुन मंदिर विहीर, मुळे हॉस्पिटल, नगरेश्‍वर मंदिर, दत्त मंदिर दत्त चौक, राम मंदिर नवी पेठ, सरस्वती मंदिर सरस्वती चौक, चौंडेश्‍वरी मंदिर व वाडा, उदगिरी गल्ली, काळजापूर मारुती मंदिर, किरीटस्वामी मठ, महासिद्धेश्‍वर मंदिर डफरीन चौक, गद्रे लक्ष्मी मंदिर, केकडे राधाकृष्ण मंदिर, भडंगे विठ्ठल मंदिर, शनी मंदिर, दिंडोरकरवाडा पाणीवेस, पापय्या तालीम, जुनी मिल विहीर (दोन) आणि एनजी मिल विहीर. 

हे आवर्जून वाचा... तुमच्या बाळाची योग्य काळजी घेताय ना...

ग्रेड तीनमध्ये या वास्तूंचा आहे समावेश 
महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय (मोतीबाग) आणि माटे बाग, बेंबळगी विद्यालय तुळजापूर वेस, सरस्वती मंदिर शाळा, सेवासदन शाळा, हायर प्रायमरी शाळा, अब्दुलपूरकर वाडा, काडादी वाडा (मंगळवार पेठ), थोबडे वाडा, जीवनमहाल माणिकचंद शहा बंगला, शेटेवाडा, चंडक बंगला टिळक चौक, चंडक बंगला मोदी, धनराज महल, बसवंती बंगला, कुंतोजी मठ, सोमाणी बंगला मुख्य रस्ता व कॉर्नर बंगला आणि जेठाराम भवानी (रणजित गांधी). 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: आकाश आणि बाहेरील
इंद्रभुवन इमारत 

 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: आकाश, ट्रेन आणि बाहेरील
लक्ष्मी विष्णू गिरणीची चिमणी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Class of heritage buildings in Solapur fixed by municipal corporation