शिवरायांच्या जयघोषात पन्हाळगड चकाचक

आनंद जगताप
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

अन्‌ आसमंत शिवगर्जनेने दुमदुमला
पन्हाळगडी वीर शिवा काशीद पुतळ्याजवळ असताना किल्ले रायगडवरील विकासकामांसाठी पुरातत्त्व विभागाची मंजुरी मिळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आल्याचे संभाजीराजे यांनी सांगताच उपस्थितांच्या शिवगर्जनेने आसमंत दुमदुमला.

पन्हाळा - बेंजोचा दणदणाट, फटाक्‍यांची आतषबाजी, हारतुरे, गुलाबफुलांचे गुच्छ यांचा खच, मोठमोठे छबीचे फलक म्हणजे वाढदिवस. अशा या आजच्या जमान्यात हातात खराटे, झाडू, खोरे घेऊन पन्हाळगडावर आलेले विविध मंडळांचे युवक-युवती, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी "शिवाजी महाराज की जय' "जय शिवाजी जय भवानी'च्या गजरात गडाची स्वच्छता केली. त्यांनी चकाचक केलेली तटबंदी हा कौतुकाचा विषय ठरला.

निमित्त होते, किल्ले संवर्धनचे ब्रॅंड अँबेसिडर खासदार संभाजीराजे यांच्या वाढदिवसाचे आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या दुर्गसंवर्धन मोहिमेचे. शिवजयंतीनिमित्त ही राज्यव्यापी मोहीम शनिवारपासून सुरू झाली, तिचा प्रारंभ संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पन्हाळगडावर झाला.

हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले तरुण-तरुणींना पाहून संभाजीराजे भारावून गेले आणि त्यांनी आजपासून 103 गडकोटांवर ही स्वच्छता मोहीम सुरू झाल्याचे सांगितले. मोहिमेमागची पार्श्‍वभूमी त्यांनी सांगितली.

अन्‌ आसमंत शिवगर्जनेने दुमदुमला
पन्हाळगडी वीर शिवा काशीद पुतळ्याजवळ असताना किल्ले रायगडवरील विकासकामांसाठी पुरातत्त्व विभागाची मंजुरी मिळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आल्याचे संभाजीराजे यांनी सांगताच उपस्थितांच्या शिवगर्जनेने आसमंत दुमदुमला.

Web Title: clean Panhalgad