‘पाच रुपयांत शुद्ध पाणी’ ठरले गाजर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

महाबळेश्वर - पाच रुपयांत ‘एटीएम’द्वारा एक लिटर शुद्ध पाणी हे येथील पालिकेच्या सत्ताधारी भाजपने पर्यटकांना दाखविलेले स्वप्न अखेर गाजर ठरले आहे. 

महाबळेश्वर - पाच रुपयांत ‘एटीएम’द्वारा एक लिटर शुद्ध पाणी हे येथील पालिकेच्या सत्ताधारी भाजपने पर्यटकांना दाखविलेले स्वप्न अखेर गाजर ठरले आहे. 

केंद्र शासनाने नगरपालिकांसाठी स्वच्छता अभियान २०१८ ही स्पर्धा जाहीर केली होती. महाबळेश्वर व पाचगणी पालिकेने या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्यात पाचगणी पालिकेला यश आले. देशात पाचगणी आपल्या गटात अव्वल क्रमांकाने जिंकली. पालिकेच्या नियोजनशून्य आणि दिशाहिन कारभारामुळे महाबळेश्वरला १९ व्या स्थानापर्यंत पोचताना चांगलाच घाम आला होता. अभियानात ज्या ज्या गोष्टींसाठी गुण होते, त्या गोष्टी खरेदी करण्याचा सपाटा पालिकेने लावला होता. पर्यटकांच्या सोईसाठी असे लेबल लावून पालिकेने एक वॉटर एटीएम मशिन खरेदी करून वेण्णालेक जवळील टोल नाक्‍यावर बसविले. परंतु, दुर्दैवाने पहिल्या दिवसापासून ते मशिन बंद अवस्थेत धूळखात पडले आहे. यासंदर्भात वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर पालिकेच्या कारभाऱ्यांनी पहिल्या दिवसापासून ते मशिन 
आजपर्यंत बंद अवस्थेत धूळखात पडले आहे. यासंदर्भात वृत्तपत्रात वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पालिकेच्या कारभाऱ्यांनी हालचाली करत एटीएम मशिन टोल नाक्‍यावरून हलवून ते वेण्णालेक परिसरामध्ये पर्यटकांसह स्थानिक नागरिक, स्टॉलधारकांच्या सोईसाठी बोटक्‍लबजवळ बसवले.

मशिनला तातडीने पाण्याची लाईनही जोडण्यात आली. मशिन सुरू करण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू केले. पाच रुपयांचा कॉईन टाकल्यानंतर एक लिटर पाणी मिळण्याची सोय यामध्ये करण्यात आली. त्याचा लाभ पर्यटकांना तर होणार होता तसेच तेथे असलेले घोडेवाले, स्टॉलधारक, बोटक्‍लबच्या कर्मचाऱ्यांनाही होणार होता. मात्र, अनेक प्रयत्न करूनही पालिकेला हे मशिन सुरू करण्यात आजपर्यंत यश आले नाही. प्रयत्न करूनही हे मशिन सुरू होत नसल्यामुळे पालिकेने मशिन सुरू करण्याचे प्रयत्न सोडून दिले आहेत. हे मशिनच निकृष्ट दर्जाचे असल्याने सुरू होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाच रुपयांत एक लिटर शुध्द पाणी हे पालिकेच्या सत्ताधारी भाजपने पर्यटकांना दाखविलेले गाजर ठरले आहे.

एटीएम मशिन निकृष्ट दर्जाचे 
पालिकेने खरेदी करून बसवलेले हे मशिन निकृष्ट दर्जाचे असल्याने ते सुरू होत नसल्याची नागरिकांत चर्चा आहे. ठेकेदारही या मशिनकडे फिरकत नसल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब होत आहे.

Web Title: Clean water in five rupees Issue