स्वच्छता ऍपला शहरातून प्रतिसाद नाही

Cleanliness App is not responding to the city
Cleanliness App is not responding to the city

नगर : भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत देशातील कोणत्याही जागेत अस्वच्छता आढळून आल्यास नागरिकांना तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छता ऍप उपलब्ध केले आहे. या ऍपवर तक्रार नोंदविताच दोन दिवसांत समस्या सोडविण्याचे बंधनच स्थानिक प्रशासनाला घालण्यात आले आहे. समस्या न सुटल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाकडून कारवाई होते. मात्र, या उपयोगी ऍपविषयी माहिती नसल्याने येथील नागरिकांचा त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानात कामे कमी अन्‌ फोटोसेशन वाढले होते. ही बाब लक्षात येताच, नागरिकांना आपल्या परिसरात आढळणाऱ्या अस्वच्छतेची तक्रार थेट शासनाकडे करता यावी व या तक्रारीची सोडवणूक अवघ्या काही तासांत करणे शक्‍य व्हावे म्हणून केंद्र शासनाने स्वच्छता ऍप उपलब्ध केले आहे. या ऍपवर स्वच्छता व आरोग्याबाबतच्या 15 प्रकारच्या समस्यांची तक्रार करता येते. मृत जनावरे, सार्वजनिक शौचालयांमध्ये वीज- पाणी नाही, ड्रेनेज तुंबणे, ड्रेनेजला झाकणे नाहीत, पावसाचे पाणी साचणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, रस्त्यावर पाणी साचणे, मैला उघड्यावर टाकणे, उघड्यावर शौच करणे, कचराकुंड्या स्वच्छ नसणे, घंटागाड्या वेळेवर न येणे, कचरा रॅम्प, रस्ते झाडलेले नसणे आदी समस्यांची तक्रार स्वच्छता ऍपमध्ये नोंदविता येते. प्ले-स्टोअरवर हे ऍप मोफत मिळते. त्यावर समस्येचे छायाचित्र व माहितीही टाकावी लागते. या ऍपवर तक्रार नोंदविल्यास आठ तास ते 48 तासांत समस्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सोडवाव्या लागतात. या ऍपची अजूनही नगर शहरातील नागरिकांना माहिती नाही. या ऍपच्या वापराविषयीची जनजागृती महापालिका प्रशासनाकडून होणे आवश्‍यक आहे. या ऍपच्या वापरावरून शासनाला, त्या शहरातील नागरिक स्वच्छतेबाबत किती जागरूक आहेत, याची माहिती मिळते. त्यानुसार शासन त्या शहराचे स्वच्छतेबाबत गुणांकन करते. नगर शहरात आतापर्यंत 11 हजार 363 लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. यातील एक हजार 442 जणांनीच तक्रारी नोंदविल्या आहेत. यातील काहीच जणांच्या तक्रारी सोडविणे बाकी आहे. नागरिकांनी या ऍपचा वापर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी करणे आवश्‍यक आहे. - सुरेश भालसिंग, स्वच्छता अभियान समन्वयक ऍपच देते कारवाईचा कालावधी स्वच्छता ऍपवर तक्रार नोंदविताना माहिती दिल्यानंतर ही समस्या सोडविण्याचा कालावधी ऍपच नागरिकांना कळविते. तसेच, समस्या सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावाही हे ऍप करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com