#KolhapurFloods पूर ओसरलेल्या भागात महानगरपालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - कोल्हापूर शहरात पूराचे पाणी ओसरत असून पूर आलेल्या भागात आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंंधात्मक उपाययोजना म्हणून या भागाची स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेली आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर शहरात पूराचे पाणी ओसरत असून पूर आलेल्या भागात आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंंधात्मक उपाययोजना म्हणून या भागाची स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेली आहे.

आज सकाळी 6.30 वाजल्यापासून ही स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली असून या मोहिमेत फोर्ड कॉर्नर येथे 8 डंपर, सिध्दार्थनगर 3 डंपर, उतरेश्वरपेठ 2 डंपर, पंचगंगा तालीम परिसर 1 डंपर, सिता कॉलनी 1 डंपर, व्हिनस कॉर्नर 1 डंपर, बावडा परिसर 2 डंपर, मुक्त सैनिक वसाहत, शिरोजी जकात नाका परिसर 1 डंपर, रमणमळा, कारंजगेमळा येथे 1 डंपर पूरातून वाहुन आलेला कचरा व गाळ काढण्यात आला आहे.

स्वच्छता केल्यानंतर रोगराई पसरु नये यासाठी या परिसरात धुर व औषध फवारणीही करण्यात येत आहे. यावेळी गाळा उठाव करणेसाठी 4 जे.सी.बी., 8 डंपर, 2 जेट मशीन, 1 फायर फायटर व 200 सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. 

स्वच्छता मोहिमे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयंत पोवार, आरोग्य निरिक्षक मनोज लोट, राजुल राजगोळकर, शुभांगी पोवार, अरविंद कांबळे, नंदु पाटील, करण लाटवडे, अरविंद कांबळे, मुकादम व सफाई कर्मचाऱ्यांनी राबविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cleanliness campaign by Kolhapur Corporation in Flood affected area